एक्स्प्लोर

नवीन घर घेताय, नवीन घराची नोंदणी करताय; महारेराकडून सुरक्षित अन् संरक्षित घर खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

घर विक्रीकरार आणि घर नोंदणीपत्र पार्किंग व सेवा सुविधांच्या निर्धारित तपशीलासह महारेराने निश्चित करून दिल्यानुसारच आहे ना ,याचीही खात्री करुन घ्या...

मुंबई: बहुतेकजण आयुष्यभराची कमाई घालून घर घेत असतात. या गुंतवणुकीत फसवणूक होऊ नये म्हणून महारेराने घरखरेदीदारांना कायदेशीररित्या सक्षम करणारे अनेक  निर्णय घेतलेले आहेत. आता महारेराने घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत (Guidelines issued for house purchase by MahaRERA). या सूचनांनुसार पुरेपूर काळजी घेतल्यास सुरक्षित व संरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.

संबंधित गृहनिर्माण प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असायला हवा, हे तर अत्यावश्यक आहेच. याशिवाय संबंधित प्रकल्पावर न्यायालयात काही खटले प्रलंबित आहेत का ? (  Litigation) असल्यास कुठली ?  त्याची सद्यस्थिती काय ? एकूण तपशील काय ? कुठला 'बोजा' (Encumbrance )  या प्रकल्पावर आहे का ?  प्रकल्पाचे प्रारंभ प्रमाणपत्र (CC) किती मजल्यांसाठी आहे, संबंधित स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून  दिल्या जाणाऱ्या प्रकल्प मंजुरीच्या आराखड्यात ( Approved Plan) समग्र प्रकल्पात कशाकशाला मंजुरी दिलेली आहे या बाबींची घरखरेदीदाराने प्रत्यक्ष व्यवहारापूर्वी खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे. महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी करताना हा सर्व तपशील ,पूरक कागदपत्रांसह देणे बंधनकारक केलेला आहे. संबंधित प्रकल्पाच्या महारेरा  नोंदणीक्रमांकाच्या मदतीने महारेराच्या संकेतस्थळावर ( https://maharera.maharashtra.gov.in) तो सर्वांसाठी उपलब्ध आहे.  

घरखरेदीदार आणि प्रवर्तक यांच्यातील घर विक्री करार (Agreement for Sale) आणि घर नोंदणी केल्याचे पत्र ( Allotment letter) हे महारेराने प्रामाणिकृत केलेल्या मसुद्यानुसारच द्यावे, असे बंधन प्रवर्तकांवर घातलेले आहे. घर खरेदी करारात दैवी आपत्ती ( Force Majeure) , चटई क्षेत्र, ( Carpet Area ) दोष दयित्व कालावधी ( Defect liability period) आणि हस्तांतरण करार (Conveyance deed  ) या बाबी अपरिवर्तनीय ( non- negotiable) राहतील. त्यात बदल करता येणार नाही. नोंदणी पत्र  देताना सदनिका क्रमांक,  चटई क्षेत्र,  प्रकल्प पूर्णत्वाचा अपेक्षित दिनांक  याचा तपशील नोंदवणे यात बंधनकारक करण्यात आलेला आहे. एवढेच नाही प्रवर्तकाने घर खरेदीकरारात आणि नोंदणीपत्रात स्वतंत्र जोडपत्रात पार्किंग आणि आश्वासित सोयी सुविधांचा समग्र तपशील देणेही बंधनकारक केलेले आहे. यात पार्किंग आच्छादित, खुले, मेकॅनिकल, गॅरेज कसे राहील हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. शिवाय या पार्किंगची लांबी, रूंदी, उंची,  प्रकल्पस्थळी पार्किंगची प्रत्यक्ष जागा हेही या जोडपत्रात नोंदवणे आवश्यक आहे. प्रकल्पात आश्वासित केलेल्या विविध सोयी, सुविधा कधी उपलब्ध होणार,  सोसायटीला कधी हस्तांतरीत होणार हेही या जोडपत्रात नमूद करणे गरजेचे आहे.

प्रवर्तकाला घर विक्रीकरार करणे बंधनकारक- 

याशिवाय तुम्ही एकूण रकमेपैकी 10 टक्क्यांपर्यंत  रक्कम देऊन घरखरेदी, घर नोंदणी करीत असल्यास प्रवर्तकाला घर विक्रीकरार करणे बंधनकारक आहे. करीत नसल्यास तुम्ही महारेराकडे तक्रार नोंदवू शकता. तसेच ज्यांच्यामार्फत हा व्यवहार करताय ते मध्यस्थ महारेरांकडे नोंदणीकृत असायलाच हवेत. म्हणून  या सर्व बाबींचीही खात्री करून घ्यायला हवी. शिवाय विहित कालावधीत, विहित प्रपत्रात प्रकल्पाबाबत सद्यस्थिती दर्शवणारे अनुपालन अहवाल सादर न करणाऱ्या आणि प्रकल्प व्यापगत झाला तरी सद्यस्थिती महारेरा संकेतस्थळावर अद्ययावत न करणाऱ्या प्रकल्पांची महारेरा नोंदणी स्थगित करण्यात येते. या प्रकल्पांची बँक खाती गोठवून त्यांचे एकूण व्यवहार थांबवण्यात येतात. या प्रकल्पांच्या याद्याही महारेरा संकेतस्थळावर दिलेल्या असतात.  गुंतवणूकदारांनी या याद्याही बघून घ्यायला हव्या. भविष्यात उपस्थित होणाऱ्या अनेक शक्यतांबद्दल आधीच काळजी घेऊन महारेराने अनेक बाबी प्रवर्तकांना बंधनकारक केलेल्या आहेत. घरखरेदीदाराला कायदेशीर दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गरज आहे गुंतवणूकदारांनी सजगपणे या तरतुदींची पूर्तता प्रवर्तक करतात की नाही हे पाहण्याची. घर नोंदणीपूर्वी त्याची छाननी करण्याची. त्यासाठी आग्रह धरण्याची. त्यातूनच आपली गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित राहायला मदत होणार आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget