एक्स्प्लोर
मेट्रो 3 मुळे सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीला तडे, प्राचार्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कुलाबा-सीप्झ मेट्रो प्रकल्प 3 च्या कामामुळे मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीला धोका निर्माण होत आहे.

मुंबई : कुलाबा-सीप्झ मेट्रो प्रकल्प 3 च्या कामामुळे मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीला धोका निर्माण होत आहे. अशा आशयाचं एक पत्र सिद्धार्थ कॉलेजच्या प्राचार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं आहे. जुलै- ऑगस्ट 2017 पासून हे मेट्रो - 3 प्रकल्पाचं काम सुरु झालं आहे. त्यांनंतर ऑगस्टमध्ये जेंव्हा खोदकाम सुरु झालं, तेंव्हा सिद्धार्थ कॉलेजच्या 4 मजली इमारतीच्या बेसमेंटला तसंच इतर मजल्यावर तडे जात असल्याचं प्राध्यापकांच्या निदर्शनास आलं. यावेळी त्यांनी एमएमआरसीला याबाबत तक्रार केली. मात्र त्यांनंतरही त्यावर कोणत्याही प्रकारची दखल न घेता काम सुरुच आहे. त्यामुळे बेसमेंटला मोठ्या प्रमाणावर तडे जात असून त्यामुळे सिद्धार्थ कॉलजेची इमारत धोकादायक बनली आहे. फोर्ट परिसरातील या कॉलेजमध्ये 4500 विद्यार्थी शिक्षण घेतात त्यासोबतच 140 प्राध्यापक अध्ययनाच काम करतात. त्यामुळे यांच्या जीवाला धोका असल्याच आणि अध्ययनात या कामामुळे अडथळा निर्माण होतं असल्याचं पत्र प्राचार्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. याबाबत मेट्रोने मात्र अशाप्रकारची कोणतेही तक्रार आली नसल्याचं सांगितलं आहे.
आणखी वाचा























