(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी; मिलिंद नार्वेकरांचा सुधा मूर्तींना थेट फोन, म्हणाले...
ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड होताच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी सुधा मूर्ती (Sudha Murti) यांना थेट फोन केला आहे.
Britain New PM Rishi Sunak : ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नवे नेते ऋषी सुनक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीच्या आधीपासूनच त्यांच्या भारतीय कनेक्शनवर चर्चा चालू आहे. इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे ते जावई. सुनक यांची पंतप्रधानपदी निवडीची बातमी येताच मूर्ती परिवारावर देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड होताच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी सुधा मूर्ती (Sudha murthy) यांना थेट फोन केला आहे. नार्वेकरांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. सुनक यांची पंतप्रधानपदी निवड होताच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुधा मूर्ती यांना थेट फोन केला आहे. ट्वीट करत नार्वेकरांनी याविषयीची माहिती दिली.
Had a telephonic conversation with ex-@TTDevasthanams member Smt. @sudhamurty ji and extended my best wishes to the Murthy family and @RishiSunak ji on becoming the Prime Minister of the UK.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 25, 2022
आपल्या ट्वीटमध्ये मिलिंद नार्वेकर म्हणतात, "तिरुपती देवस्थानाच्या माजी सदस्या श्रीमती सुधा मूर्ती यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनल्याबद्दल मूर्ती परिवाराला माझ्या शुभेच्छा दिल्या, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
किंग चार्ल्स तृतीय यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नवे नेते ऋषी सुनक यांची नियुक्ती केली आहे. ऋषी सुनक यांनी मंगळवारी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेतली. किंग चार्ल्स यांनी त्यांना देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आणि त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री सुनक हे भारतीय वंशाचे असून ते गेल्या 210 वर्षांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत.
ही बातमी देखील वाचा- Rishi Sunak : कॉलेजमधल्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर, बंगळूरूमध्ये लग्नगाठ, ऋषी सुनक यांची फिल्मी लव्हस्टोरी
सुनक यांच्यासमोर अनेक आव्हानं
मंगळवारी लिझ ट्रस यांनी किंग चार्ल्स यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. लिझ ट्रस यांनी केवळ 45 दिवसातच (20 ऑक्टोबर) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ऋषी सुनक हे सोमवारी (24 ऑक्टोबर) कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते बनले. त्यांच्या प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डंट टोरी खासदारांकडून पुरेसा पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरला. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची आर्थिक विश्वासार्हता कमी करणारी अर्थसंकल्पीय तूट यासारख्या समस्यांशी ब्रिटनने ग्रासले आहे. अशा परिस्थितीत सुनक यांनी देशाची सत्ता हाती घेतली.