(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Bank : प्रवीण दरेकरांना दिलासा मिळणार ? अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी
Mumbai Bank Scam : भाजप नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
Mumbai Bank Scam : मुंबई बँकेत मजूर म्हणून बोगस नोंद करून संचालक मंडळात निवडून गेल्याचा आरोप असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप प्रवीण दरेकर यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयानं शुक्रवारी दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र या निकालाल हायकोर्टात आव्हान देता यावं यासाठी मंगळवारपर्यंत त्यांन् अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला होता.
डिसेंबर 2017 मध्ये नागपूर अधिवेश सुरू असताना मजूर म्हणून काम केल्याचा परतावा कसा घेतला?, साल 2017 च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काम केल्याबद्दल दरेकरांनी 25 हजार 700 रूपयांची मजूर घेतल्याची नोंद आहे. त्यामुळे एकाचवेळी दरेकर दोन्ही ठिकाणी उपलब्ध कसे होते?, त्यामुळे यात प्रथमदर्शनी खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचं सत्र न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले. राज्य सरकारनं प्रवीण दरेकरांच्या याचिकेला जोरदार विरोध करत फसवणुकीच्या या प्रकरणात त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याची भूमिका घेतली होती. काही वर्षांपूर्वी मजूरी करणाऱ्या दरेकरांकडे कोट्यावधींची मालमत्ता कशी आली?, याचीही चौकशी होणं गरजेचं असल्याचं विशेष सरकारी वकीलांनी म्हटले होते.
काय आहे प्रकरण?
20 वर्षे मजूर प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर निवडून येणारे प्रवीण दरेकर हे मजूर नाहीत. अशी तक्रार आपचे नेते धनंजय शिंदे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीअंती 3 जानेवारी 2022 रोजी विभागीय सहनिबंधकांनी प्रवीण दरेकर यांना मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवलं. त्यानंतर शिंदे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलीसांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याविरोधात दरेकरांनी हायकोर्टात धाव घेत गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र दरेकरांना अटकेपासून कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांना रितसर अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha