Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करुन अहवाल सादर करा, मुंबई हायकोर्टाच्या सातारा पोलिसांना सूचना
Jaykumar Gore : सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हायकोर्टानं निष्पक्ष तपास करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुंबई : भाजपा आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या विरोधातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून तपासाचा अहवाल सादर करा, अशा सूचना मुंबई हायकोर्टाना सातारा जिल्हा पोलिसांना (Satara Police) केली आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी कोविड काळात 200 पेक्षा अधिक मृत रुग्णांना (Covid Center Scam) जिवंत दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप मायणी येथील दीपक देशमुख (Deepak Deshmukh) यांनी केला होता. जयकुमार गोरेंविरोधात हायकोर्टात याचिका दीपक देशमुख यांनी केली होती.
दीपक देशमुख यांनी तक्रार करताच राजकीय दबावातून त्यांच्या विरोधात ईडीची कारवाई सुरू केल्याचा आरोप हायकोर्टात करण्यात आला. जयकुमार गोरे, त्यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे.
सरकारनं मोफत कोरोना उपचारासाठी सर्व रुग्णालयं आणि कोविडसेंटरना मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा विनामुल्य देण्याकरता पुरवला होता. मात्र, गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखी खाली करण्याची याचिकेतून दीपक देशमुख यांनी मागणी केली होती. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सातारा पोलिसांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पुढील सुनावणी तीन आठवड्यांकरता तहकूब करण्यात आली आहे.
हायकोर्टाच्या आदेशानंतर जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल
साताऱ्यातील मायणी येथील मेडिकल कॉलेजमधील कोविड घोटाळा प्रकरणात अध्यक्ष आ.जयकुमार गोरे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख आणि संस्थेशी निगडित पदाधिकाऱ्यांच्यावर गुन्हा सातारा पोलिसांच्यावतीनं दाखल करण्यात आला. हायकोर्टातील सुनावणीपूर्वी हा गुन्हा नोंदवण्यात आला.
कोविड काळात मायणी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यावर मृत लोक जिवंत दाखवून 35 लोकांचे पैसे हडपल्याचा संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात हायकोर्टाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टात या प्रकरणातील चौकशीची मागणी करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख हे संस्थेचे उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्यचे अधिकारी देविदास बागल यांनी या संस्थेतील सर्व जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर वडूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवर केला गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित बातम्या :