एक्स्प्लोर

Jaykumar Gore : मायणी कोविड घोटाळा प्रकरणी जयकुमार गोरे यांच्या अडचणी कायम, सातारा पोलीस अधीक्षकांची हायकोर्टाकडून कानउघडणी

Jaykumar Gore : माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या मायणी कोविड घोटाळा प्रकरणी अडचणी कायम आहे. हायकोर्टानं सातारा पोलिसांची कानउघडणी केली आहे.

मुंबई: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच दरम्यान मुंबई हायकोर्टात मायणी कोविड घोटाळा प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. मुंबई हायकोर्टातील या सुनावणीमुळं माणचे आमदार आणि भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या अडचणी कायम आहेत. मुंबई हायकोर्टाकडून या प्रकरणात सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची कानउघडणी करण्यात आली आहे. 

मायणी कोविड घोटाळा प्रकरणी जयकुमार गोरे यांच्या अडचणी कायम आहेत. कारण, सातारा पोलीस अधीक्षकांची मुंबई हायकोर्टाकडून कानउघडणी करण्यात आली आहे.   मृत व्यक्तींना जिवंत दाखवून केलेल्या कोविड घोटाळाप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी कायम आहेत.  सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची आज झालेल्या सुनावणीत मुंबई हायकोर्टाकडून कानउघडणी करण्यात आली आहे.

नि:पक्षपातीपणे तपास करा

मायणी कोविड घोटाळा प्रकरणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. यापूर्वी देखील मुंबई हायकोर्टाकडून सातारा पोलिसांनी तपासाबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या सुनावणीत मुंबई हायकोर्टानं कोणाच्याही दबावाखाली काम न करता पूर्णपणे पारदर्शक व नियमांना धरून नि:पक्षपातीपणे तपास करण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत. 

मुंबई हायकोर्टानं याचिकाकर्ते दीपक देशमुख यांच्या तक्रारीवर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास करून पुढील तारखेपर्यंत तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश समीर शेख यांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

दीपक देशमुख यांची काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटका

मायणी कोविड  घोटाळा प्रकरणी दीपक देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. दीपक देशमुख यांची याचिका न्यायप्रविष्ट असून या प्रकरणी जयकुमार  गोरे यांच्या चौकशीचे आदेश हायकोर्टानं दिले होते. दरम्यानच्या काळात ईडीनं मायणी शिक्षण संस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी दीपक देशमुख यांना अटक केली होती. यानंतर दीपक देशमुख यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा देत जामीन मंजूर केला होता. 

दरम्यान,  मुंबई हायकोर्टानं यापूर्वी देखील जयकुमार गोरे यांच्या विरोधातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करुन अहवाल सदार करण्याच्या सूचना सातारा पोलीस अधीक्षकांना दिल्या होत्या. जयकुमार गोरे यांनी कोविड काळात 200 पेक्षा अधिक मृत रुग्णांना  जिवंत दाखवून निधी वाटपात घोटाळा केल्याचा आरोप  करत दीपक देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीहोती. मुंबई हायकोर्टानं सातारा पोलिसांना ऑगस्ट महिन्यातील सुनावणीत तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा एकदा सातारा पोलिसांची कानउघडणी करत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

इतर बातम्या :

Ajit Pawar : नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरु, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget