एक्स्प्लोर
कांदळवनाची कत्तल करून उभारला क्लब, भाजप आमदारासह मीरा-भाईंदर महानगरपालिकेला हायकोर्टाचा दणका
केवळ जिम्नॅशिअमसाठी परवानगी मागून या ठिकाणी हे आलिशान हॉटेल सुरू करण्यात आले. या प्रकरणाची क्राईम ब्रांचमार्फत चौकशीही करण्यात यावी तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली होती.
मुंबई : मीरा भाईंदरमधून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह महानगरपालिकेलाही मुंबई उच्च न्यायालयानं चांगलाच दणका दिला आहे. कांदळवनाची कत्तल करून बेकायदेशीररीत्या उभारल्या क्लब सेव्हन ईलेव्हन प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करा असे आदेश न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या खंडपीठानं दिले आहेत.
पालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून मीरारोड येथील कनकिया पार्क इथं खारफुटींची कत्तल करत सुमारे 3.5 एकर जागेत सेव्हन इलेव्हन नावाचा हा क्लब बांधण्यात आला. 2018 साली या आलिशान क्लबचं बांधकाम पूर्ण झालं. इथले आमदार नरेंद्र मेहता, त्यांचा भाऊ विनोद मेहता आणि मेहतांचा मेव्हणा रजनीकांत सिंह यांची या क्लबमध्ये भागीदारी आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करत इथली कांदळवनं तोडून त्यावर हा क्लब बेकायदेशीररीत्या उभारल्या प्रकरणी तक्रार दाखल करत धीरज परब या सामाजिक कार्यकर्त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. केवळ जिम्नॅशिअमसाठी परवानगी मागून या ठिकाणी हे आलिशान हॉटेल सुरू करण्यात आले. या प्रकरणाची क्राईम ब्रांचमार्फत चौकशीही करण्यात यावी तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली होती.
सीआरझेड क्षेत्रात बांधल्या जाणाऱ्या या क्लबसाठी केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी नसताना बांधकाम सुरू असल्याचा आरोप स्थानिक माहितीचे कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनी केला होता. केंद्रीय पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार नो डेव्हलपमेंट झोन आणि कोस्टल झोनच्या 200 मीटरच्या परिसरात बांधकाम करता येत नाही. बांधकाम करायचं असेल तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मात्र अशी कोणतीही परवानगी स्थानिक आमदारांनी घेतली नसल्याचा आरोप माहितीच्या कार्यकर्त्यांनी केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement