एक्स्प्लोर

22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली; म्हणाले जनहित याचिकेचा वापर काळजीपूर्वक करा

मुंबई उच्च न्यायलयाने याचिकाकर्ता विद्यार्थ्यांना खडे बोल सुनावले आहे. विधी शाखेचे विद्यार्थी या नात्यानं कुठल्या निर्णयाला आव्हान देतो येतं याची तुम्हाला कल्पना आहे का? असा हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना केला आहे.

मुंबई : राममंदिर (Ram Mandir)  सोहळ्याकरता सुट्टीविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court)फेटाळली आहे. राज्य सरकारकडून अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आलीय. त्याला विरोध करत विधी शाखेच्या विद्यार्थ्यांकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. जनहित याचिकेचा वापर काळजीपूर्वक करायला हवा, केवळ प्रसिद्धीसाठी त्याचा वापर होऊ नये. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनीही याचं भान राखायला हवं , असेही हायकोर्ट म्हणाले आहे. 

मुंबई उच्च न्यायलयाने याचिकाकर्ता विद्यार्थ्यांना खडे बोल सुनावले आहे. विधी शाखेचे विद्यार्थी या नात्यानं कुठल्या निर्णयाला आव्हान देतो येतं याची तुम्हाला कल्पना आहे का? असा हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना केला आहे.  ज्या अधिसूचनेला तुम्ही आव्हान देतोय ती याचिकेत का जोडली नाही? 1968 सालचा अध्यादेश फार महत्त्वाचा आहे, ज्याआधारे राज्य सरकारनं ही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे त्याआधारावर तुमचा युक्तिवाद विचारात घेणं योग्य ठरणार नाही, असेही  हायकोर्ट म्हणाले. 

याचिकेचा मूळ हेतू काय?

न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे रविवारी झाली विशेष सुनावणी झाली. शिवांगी अग्रवाल, सत्यजीत साळवे, वेदांत अग्रवाल व खुशी बांगीया या महाराष्ट्र आणि गुजरातमधील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती. अचानक दिलेल्या सार्वजनिक सुट्टीमुळे शैक्षणिक नुकसान तसेच बँका बंद असल्यानं आर्थिक फटकाही बसत असल्याचा दावा केला गेला होता. मात्र याचिकेचा मूळ हेतू काय?, यात पुरेशी माहिती का नाही? माध्यमांत याचिकेची माहिती कशी गेली?, सुनावणी दरम्यान झालेल्या आरोपांचं काय? हायकोर्टाच्या या प्रश्नांवर याचिकाकर्त्यांनी कोणतंही उत्तर दिले नाही. 

महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांचा युक्तिवाद 

या सोहळ्याकडे एक राजकीय कार्यक्रम म्हणून पाहिलं जातंय, तसा आरोप होणं चुकीचे आहे.  जर सर्वसामान्य जनतेच्या एकच प्रकारच्या भावना असतील, हा त्यांच्या श्रद्धेचा विषय असेल आणि त्यांना तो एकत्र साजरा करायचा असेल तर त्यात आडकाठी करणं हे देखील धर्मनिरपेक्षतेला अनुसरून नाही. या देशात अनेक सण-उत्सव एकत्र येऊन साजरे केले जातात, तो त्यांचा अधिकार आहे.यामुळे काही लोकांचा आक्षेप आहे, म्हणून एका मोठ्या जनसमुदायाला रोखं योग्य ठरणार नाही. राज्य सरकारला त्यांच्या अधिकारात अशी सुट्टी जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र त्याला अश्या पद्धतीनं आव्हान देणं चुकीचं आहे. गेली 54 वर्ष हे अधिकार अस्तित्त्वात आहेत

विरोध करणा-यांचा मूळ हेतू काय? 

अशा प्रकारे रातोरात विरोध करत उभे राहणारे समाजात 'शहरी नक्षलवाद' पसरवत आहेत, असा गंभीर आरोप याचिकेत हस्तक्षेप करत वकील सुभाष झा यांनी केला आहे. भारतासह इतर काही देशांतही 22 जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व देशासाठी मानाच्या अशा या सोहळ्याला विरोध करणा-यांचा मूळ हेतू काय?, यांच्यामागे कोण आहेत?, हे तपासणे आवश्यक आहे.

हे ही वाचा :

Ayodhya Ram Mandir : नाशिकमध्ये साकारले दोन हजार खडूंचे अयोध्या राम मंदिर, कलाविष्काराने वेधले सर्वांचे लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Mumbai Pollution | मुंबईच्या प्रदुषणात वाढ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या..Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana | 'त्या' लाडक्या बहि‍णींचे पैसे बंद होणार, कोणकोण अपात्र ठरणार?Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावाBajrang Sonawane on Walmik Karad| वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता- बजरंग सोनावणे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Dhule Crime News : मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Embed widget