एक्स्प्लोर

'तांडव' वेबसीरिजचा वाद; दिग्दर्शक अली अब्बास झफरला हायकोर्टाचा अंतरिम दिलासा

सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेली 'अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ'वरील तांडव वेबसीरिज सध्या वादाच्या भोवऱ्याच अडकली आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास झफर आणि या वेबसीरिजचे निर्माता, लेखक यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम दिलासा दिला आहे.

मुंबई : गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'तांडव' या वेबसीरिजमधून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिग्दर्शक अली अब्बास झफर आणि या वेबसीरिजचे निर्माता, लेखक यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम दिलासा देत तीन आठवड्यांसाठी ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेली 'अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ'वरील तांडव वेबसीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र सीरीज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेबसीरिजमध्ये हिंदू देवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्याच्या आणि हिंदूच्या भावना दुखवल्याचा आरोप दिग्दर्शकांवर करण्यात आला आहे. चौफेर टीकेनंतर 'तांडव'चे निर्माते अली अब्बास जफर यांनी याबाबत माफी मागितली आहे. मात्र, माफीनंतरही मुंबईसह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशमधील हजारातगंज पोलीस ठाण्यात तांडव वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्राबाहेरील प्रकरणांत अटक होऊ नये त्यासाठी दिग्दर्शक अली अब्बास झफर, निर्माते हिमांशू मेहरा आणि लेखक गौरव सोलंकी यांनी ट्रान्झिट अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायलयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर बुधवारी तातडीने न्यायमूर्ती पी. डी नाईक यांच्या समोर सुनावणी पार पडली. तेव्हा, कोरोनाच्या पाश्रवभूमीवर उत्तर प्रदेशातील न्यायालयात नियमित अटकपूर्व जामीन अर्ज करता यावा म्हणून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्यावतीनं करण्यात आली. तर हिंदू देवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखविण्यात आलेला भाग वेबसीरिजमधून काढण्याच्या तयारीत असल्याचंही निर्मात्यांकडून सांगण्यात आलं. तसेच उत्तर प्रदेशातील कोर्टात नियमित अटकपूर्व जामीन अर्ज करता यावा म्हणून चार आठवड्याचा अवधी न्यायालयाकडे मागण्यात आला.

या संबधित गुन्हाची नोंद लखनऊच्या हजारातगंज पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. त्या एफआयआरची प्रत वगळता न्यायालयात कोणतेही कागद पत्र सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे इथं अटकेची कोणतीही भीती नसल्याचा दावा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशातील कोर्टात नियमित अटकपूर्व जामीन अर्ज करता यावा म्हणून तिघांनाही 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तीन आठवड्यांसाठी ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर करत त्यांना दिलासा दिला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget