एक्स्प्लोर
बॉम्ब तयार करतानाच स्फोट, मुंबईत दोघे ताब्यात
स्फोटानंतर पोलिसांनी झोपडीची तपासणी केली असता त्यात बॉल बेअरिंग, काचेचे तुकडे आणि खिळे सापडले.
मुंबई : सुतळी बॉम्बच्या दारुपासून बॉम्ब तयार करणाऱ्या दोघा तरुणांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे. बॉम्ब तयार करत असताना झालेल्या स्फोटामुळे हा प्रकार उघडकीस आला.
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात शनिवारी रात्री जोरदार आवाज झाला होता. स्फोटाचा आवाज एक किलोमीटर परिसरात ऐकू आल्याचं रहिवासी सांगतात. स्फोटात दोघांपैकी एक तरुण जखमी झाला, तर आजूबाजूच्या झोपड्यांमधील सामानही खाली पडलं.
स्फोटानंतर पोलिसांनी झोपडीची तपासणी केली असता त्यात बॉल बेअरिंग, काचेचे तुकडे आणि खिळे सापडले. सर्वसाधारणपणे दहशतवादी अशा गोष्टी बॉम्बमध्ये वापरतात. सध्या हे सगळे स्फोटकसदृश्य पदार्थ तपासणीसाठी एफएसएलला पाठवण्यात आले आहेत.
दोघेही आरोपी मूळ पश्चिम बंगालचे रहिवासी असून मुंबईतील गरीब नवाज रोडवर नूरा बाजार भागात राहत होते. त्यांच्यापैकी अरजुल शेख हा 22 वर्षांचा आहे, तर दुसरा अल्पवयीन आहे.
दोघा तरुणांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. ही केस गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली असून एक पथक पश्चिम बंगालमध्ये पुढील तपास करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement