BMC : मुंबईत रस्ते आणि रेल्वे मार्गांच्या प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या 450 झाडांचा बळी?
Mumbai Environment : एकीकडे वृक्ष संपदेची नगरी म्हणून मुंबई महापालिकेला नुकताच ‘जागतिक वृक्ष नगरी’चा पुरस्कार मिळाला, तर दुसरीकडे प्रकल्पांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या 450 झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
मुंबई: एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी लाखो नव्या वृक्षांची लागवड करण्याची मोहीम शासनाने हाती घेतलेली असताना, दुसरीकडे मुंबईत मात्र रस्ते आणि रेल्वे मार्गाच्या प्रकल्पंसाठी 450 झाडांची कत्तल प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह पालिकेला शहरात कमी होत चाललेल्या हिरवळीसाठी नोटिसा बजावल्या असल्याने प्रस्तावित झाडांची कत्तल कितपत योग्य आहे यावर पर्यावरण प्रेमींकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत
वृक्ष संपदेची नगरी म्हणून मुंबई महापालिकेला नुकताच ‘जागतिक वृक्ष नगरी’चा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराच्या माध्यमातून पालिकेने स्वत:ची पाठ थोपटवून घेतली खरी, मात्र दुसरकडे रेल्वे आणि रस्त्यांच्या प्रकल्पांसाठी 450 झाडे तोडण्याचा प्रस्ताव ठेवल्याने त्यांच्यावर टिकाही होत आहेत. मुंबईतील नेमकं कुठल्या ठिकाणी किती वृक्ष तोड केली जाणार आहेत हे पाहूयात,
- ईस्टन फ्री वे येथील सर्व्हिस रोड वाढण्यासाठी 316 झाडे.
- गोरेगाव ते बोरिवली सहाव्या लेनच्या कामासाठी 130 झाडे.
- कांदिवली येथील लालजी पाडा येथील प्रस्तावित पुलाच्या कामासाठी 4 अशी झाडे कापण्यात येणार आहेत.
विकासाच्या नावाखाली दररोज मुंबई वृक्षतोड केली जात आहे. त्या बदल्यात अधिकची वृक्ष लावण्याची हमीही दिली जाते. मात्र प्रत्यक्षात त्याची कुठलीही अंमलबजावणी होत नाही. मुळातच मुंबईतील पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रदूषण पसरवण्यास शासनाचे विविध विभागच जबाबदार आहेत. न्यायालयाने याची दखल घेतली असून नागरिकांना न्याय मिळेल अशी आशा असल्याची टीका पर्यावरण प्रेमींकडून होतं आहे.
ही बातमी वाचा: