एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत भाजपच मोठा पक्ष : आशिष शेलार
मुंबई: मुंबईत शिवसेना मोठा पक्ष ठरतेय असं वाटत असताना, भाजपने मुसंडी मारत, आपणच मोठा पक्ष असल्याचा दावा केला आहे.
भाजपने 81 जागांवर विजय मिळवला असून, चार अपक्षांसह सर्वाधिक 85 जागा जिंकल्याचा दावा भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला.
एकूण 227 पैकी 226 जागांचा निकाल जाहीर झाला. त्यापैकी शिवसेनेला 84, भाजप 81, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7, MIM -3 , सपा 6,अखिल भारतीय सेना 1, अपक्ष 4, निवडून आले.
यानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाचा, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा असल्याचं म्हटलं.
तसंच शिवसेनेची वाढ ही शाळेतील मुलांच्या फूटपट्टीएवढी आणि भाजपची वाढ ही काही पटींमधली असल्याचं शेलार म्हणाले.
अपक्ष नगरसेवकांपैकी रहेबर राजा खान यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला. तसंच शिवसेना-काँग्रेसने मॅच फिक्सिंग करुनही भाजपला यश मिळाल्याचा शेलार म्हणाले.
"आमचा हा दणदणीत विजय आहे. हा विजय मुंबईकरांना सुपूर्द करतो. मुख्यमंत्र्यांच्या कर्तृत्वाचा हा विजय आहे. भाजपने 32 वरुन 82 जागांपर्यंत मजल मारली आहे. शिवसेनेची वाढ शाळेतील फूटपट्टीएवढी तर भाजपची वाढ काही पटींनी आहे" आशिष शेलार
संबंधित बातम्या
BMC result 2017 live - मुंबईत भाजपची घोडदौड
BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement