BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिका भरतीतील अन्यायकारक अट मागं घ्या, यशोमती ठाकूर यांनी दिला UPSC अन् MPSC चा दाखला, मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेतील भरतीमध्ये निश्चित करण्यात आलेली अन्यायकारक अट मागं घ्यावी अशी मागणी यशमोती ठाकूर यांनी केली आहे.
मुंबई : काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई महापालिका भरतीतील एका अटीबाबत मोठी मागणी केली आहे. मुंबई महापालिकेनं नुकतीच 1846 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेनं कार्यकारी सहायक (BMC Recruitment 2024) या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या अटीमुळं अनेक उमेदवार अर्ज भरु शकणार नसल्यानं त्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळं यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाही, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का?
यशोमती ठाकूर पुढं म्हणाल्या की अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो, असा सवाल देखील त्यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
मुंबई महापालिकेत 1846 पदांची भरती
मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. 25,500-81100 (पे मॅट्रिक्स-एम 15) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 9 सप्टेंबरपर्यंत आहे.
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) August 21, 2024
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची… pic.twitter.com/HtUlUioQqT
संबंधित बातम्या :