BMC Notice to Narayan Rane : पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना! नारायण राणेंच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार; BMC ची नोटीस
BMC Notice to Narayan Rane : मुंबई महापालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणेंंना नोटीस धाडली आहे. मुंबईतल्या बंगल्यात अनधिकृत बांधकामाची तक्रार आल्यामुळे BMC नं ही नोटीस धाडली आहे.
BMC Notice to Narayan Rane : एकीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे आणि रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता मुंबई महापालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
मुंबई महापालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाबाबत नोटीस पाठवली आहे. राणेंच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार असून बंगल्याची तपासणी करण्यासाठी महापालिकेनं नोटीस पाठवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे वाद रंगण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचं पथक आज नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यात पाहणी करून अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीबाबत तपासणी करेल, अशी नोटीस राणे यांना पाठवली आहे. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याबाबत तक्रार केली आहे. बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची याआधी तक्रार करूनही महापालिकेनं कारवाई केली नसल्याचं दौंडकर यांनी महापालिकेला कळवलं आहे. त्यानंतर महापालिकेनं ही नोटीस पाठवली आहे. बंगल्याचं बांधकाम करताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ : नारायण राणेंना मुंबई मनपाची नोटीस, जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार
नारायण राणेंच्या बंगल्याबाबत काय आक्षेप?
- नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाबत आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्याकडून तक्रार
- बंगल्याचं बांधकाम करताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार
- बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप करत कारवाईसाठी संतोष दौंडकर यांच्याकडून 2017 पासून पाठपुरावा
- मुंबई महापालिकेच्या के पश्चिम वॉर्डच्या बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटकडून नारायण राणेंना नोटीस
- अनधिकृत बांधकामाबाबत आलेल्या तक्रारींनंतर बंगल्याची पाहणी करण्यासाठी मनपाकडून नारायण राणे यांना नोटीस
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ट्विटर वॉर : नारायण राणे विरुद्ध मिलिंद नार्वेकर
- Sanjay Raut : शिवसेना 2024 पर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल : संजय राऊत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha