Kishori Pednekar : हत्तीच्या पिल्लाला चंपा तर माकडाच्या पिल्लाला चिवा नाव ठेवू; BMC महापौर पेडणेकरांची टोलेबाजी
यापुढे हत्तीच्या पिल्लाला चंपा आणि माकडाच्या पिल्लाचं चिवा असं नाव ठेवू, असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना लगावला आहे.
Kishori Pednekar : राणी बागेतील पेग्वीनच्या पिलाचं नाव ऑस्कर ठेवल्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या टिकेला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. "तुम्ही सांगत आहात की, नावं मराठीत ठेवा तर यापुढे हत्तीच्या पिल्लाला चंपा आणि माकडाच्या पिल्लाचं चिवा असं नाव ठेवू, असा टोला महापौर किशोरी पेडणेकरांनी लगावला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "आम्ही सामान्य जनतेसाठी कामे करत आहोत. परंतु, ही कामं न पाहता फक्त विरोधाला विरोध म्हणून खालच्या पातळीवरील टीका करणं योग्य नाही. आम्ही वाघीनीच्या बछड्याचं नाव विरां ठेवलं आहे. हे नाव मराठीतच आहे. प्राण्यांची नावे मराठीत ठेवण्याची भाजपची मागणी असेल तर यापुढे हत्तीच्या पिल्लाचं चंपा असं नाव ठेवू आणि माकडाच्या पिल्लाचं चिवा असं नाव ठेवू, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांना लगावला.
मुंबईतील कोरोना नियंत्रणात
दरम्यान, यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील कोरोना नियंत्रणात आल्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, "महापालिकेकडून कोर्टात देण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबईमधील कोरोना आता नियंत्रणात येत आहे. तीन ते चार पटीत रुग्णसंख्या कमी होत आहे."
पालकांनी संमतीपत्र द्यावं
राज्यातील बंद असलेल्या शाळांवर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ज्या पालकांना आपल्या मुलाला शाळेत पाठवायचं आहे, त्यांनी त्याबाबतचे संमतीपत्र द्यावं आणि मुलांना शाळेत पाठवावं. त्याबरोबरच पालकांनीही विश्वासानं मुलांना लस देण्यासाठी संमती द्यावी, असे आवाहन पेडणेकर यांनी केले.
मिहार कोटेचा चांगले बिल्डर
दरम्यान, राणी बागेतील कंत्राटावरूनही किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली. "मिहार कोटेचा हे चांगले बिल्डर आहेत आणि त्याच माध्यमातून आमदार झाले आहेत. कंत्राटाची प्रक्रीया कशी असते हे त्यांना माहिती आहे. राणी बागेतील कंत्राटाच्या प्रक्रीया अजून सुरु आहेत. ज्या तक्रारी येतात त्याला संबंधित खात्याने उत्तरेही दिली आहे," अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिली.
Kishori Pednekar On Chitra Wagh : हत्तीच्या पिल्लाला चंपा आणि माकडाच्या पिल्लाला चिवा नाव देऊ
महत्वच्या बातम्या
- Jitendra Awhad : 'जीव देऊ पण वाचवू'! जितेंद्र आव्हाड यांचा मध्य रेल्वेला इशारा
- मध्य रेल्वेकडून अनधिकृत घरं खाली करण्याच्या नोटिसा, मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीकांत शिंदे यांचा विरोध
- Goa Election 2022 : 'देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी' : संजय राऊत
- मेट्रो 4 च्या कारशेडचा मार्ग मोकळा होणार? आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून तोडगा