एक्स्प्लोर

'विरोधकांनी फिल्डवर उतरावं, मगच टीका करावी', महापौरांकडून कोविड सेंटरची पाहणी

विरोधकांनी फिल्डवर उतरावं, माहिती घ्यावी मगच टीका करावी, असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना लगावला आहे. मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री आणि महापालिका तसंच सरकारवर टीका केली होती.

मुंबई :  विरोधकांनी फिल्डवर उतरावं, माहिती घ्यावी मगच टीका करावी, असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना लगावला आहे. मुख्यमंत्री फिल्डवर येत नसल्याची टीका भाजप नेत्यांनी केली होती. त्यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री हे काम करत असतात, पण तुम्ही आधी खाली उतरा. मुंबईत लाईट गेली पण कोव्हिड सेंटर सुरक्षित आहेत. विरोधकांनी चिंता करू नये, विरोधक हे जाणकार आहेत, अशा शब्दात पेडणेकरांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

मला कळल्यानंतर मी वरळीपासून पाहाणीला सुरुवात केली. वीज गेली तरी मुंबईतील सर्व कोविड सेंटर सुरक्षित आहेत. दवाखान्यांकडे पूर्ण बॅकअप प्लान असतो. कुठेही लाईट गेली तरी कुठेही पेशंटला त्रास झाला नाही. शेलार यांच्या आरोपावर बोलताना महापौर म्हणाल्या, ते जाणकार आहेत. मात्र त्यांनी आधी त्यांनी खाली उतरुन पाहावं. ते जे काही चालवत आहेत, ते त्यांना लखलाभ. त्यांना त्यांचं राजकारण करायचं असेल तर करु द्या, असं देखील महापौर म्हणाल्या.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बीकेसीमधील कोविड 19 केअर सेंटरची पाहाणी केली. मुंबईत जवळपास दोन तास वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे विरोधी पक्षांकडून रुग्णांची गैरसोय होत असल्याचे आरोप केले जात होते. मात्र मुंबईतील कोणत्याही कोविड 19 केअर सेंटरमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला नसल्याचं बीएमसी आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. सर्व कोविड 19 सेंटरवर वीज पुरवठा खंडीत झाला तरी पूर्व नियोजित व्यवस्थेमुळे वीज पुरवठा सुरळीत सुरू होता. या सर्व परिस्थितीची पाहाणी स्वत: महापौर किशोरी पेडणेकर कोविड 19 सेंटरमध्ये जाऊन केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीनं बैठक बोलावली वीजपुरवठा खंडीत प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीनं बैठक बोलावली आहे. 4 वाजता वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीला काही मंत्री, अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित

ग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. याचा रस्ते वाहतुकीसह आणि लोकल सेवेला फटका बसला. तसेच ऑनलाईन वर्ग रद्द तर झाले तर परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यानं कोविड हॉस्पिटलचा पॉवर बॅकअप सुरु करा अशा सूचना पालिका आयुक्तांनी तर मंत्रालयासह सरकारी कार्यालयं, बँका, कोर्ट काही काळ अंधारात गेल्याचं चित्र होतं. अनेक ठिकाणी यामुळं पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला.

मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश

दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश  मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल  घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.

भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत. त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही, याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले.  उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले.

मुंबई अंधारात! वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबई, ठाणे परिसर प्रभावित; लोकल ठप्प, विद्यार्थी चिंतेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा

वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या घेतली जाणार

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात वीज गायब झाल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेचे पेपर सकाळी 11 ते 12 या वेळेत होते. मात्र मुंबईत वीज नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं शक्य होणार नाही त्यांनी चिंता करू नये. त्यांची परत परीक्षा घेतली जाईल असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. आज वीजपुरवठा खंडित झाल्याने परीक्षा होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या घेतली जाणार असल्याचं विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Mumbai Power Outage LIVE Update | वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अभियंते आणि कर्मचाऱ्यांचं काम युद्धपातळीवर सुरु : ऊर्जामंत्री नितीन राऊत

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम

बेस्ट, अदानी, एमएसईबीच्या भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. तसंच सिग्नल यंत्रणाही बंद झाली आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांनाही वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका बसला. मुंबई, दहिसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, वांद्रे, विले पार्ले, पवई या तर ठाण्यातही काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. नवी मुंबईत देखील वाशी, नेरुळ, खारघर, पनवेल या भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित झाले. मुंबईतील मोठ्या भागातील विजप्रवाह खंडित झाल्याने मुंबई अंधारात गेली होती.  विजपुरवठा खंडीत झाल्याने लोकल सेवा देखील विस्कळीत झाली. मध्य रेल्वेचा खोळंबा झाला. वीज पुरवठा खंडित झाल्याने कुर्ला ते सीएसटी लोकल ठप्प झाली होती. वीजपुरवठा सुरु झाल्यानंतर हळूहळू लोकल सेवा पूर्वपदावर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Tardeo Estate Agent Controversy : मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Embed widget