उद्धव ठाकरेंच्या सेनेचं पालिका म्हणजे, कमाईचं साधन; किरीट सोमय्यांकडून पुन्हा शिवसेनेवर टीका
Kirit Somaiya Press Conferance : उद्धव ठाकरेंच्या सेनेचं पालिका म्हणजे, कमाईचं साधन; असल्याचं म्हणत किरीट सोमय्यांकडून पुन्हा एकदा शिवसेनेवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे.
Kirit Somaiya Press Conferance : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना टार्गेट केलं आहे. कोविड काळात जाधव यांनी 15 कोटी रुपये त्यांच्या आणि नातेवाईकांच्या खात्यात वळवले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर पालकमंत्री महापौरांच्या कंपनीला कंत्राट देत असल्याचा आरोपही सोमय्यांनी केलाय. याबाबत सर्व यंत्रणांकडे तक्रार करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं आहे.
किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिनसेनेवर निशाणा साधत मुंबई महापालिकेच्या घोटाळ्यासंदर्भात आरोप केले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत. किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांच्या सेनेचं पालिका म्हणजे, कमाईचे साधन आहे. कोविडमध्ये यांनी जी लूट केली, त्याचे घोटाळे मी आता मांडणार आहे. आज मी पुराव्यासह 15 कोटी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कशापद्धतीनं एजंटला दिले. हे सांगणार आहे." , असं म्हणत किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
यशवंत जाधव यांनी 15 कोटी तुकड्या तुकड्यांनी दिले. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लि. च्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले. प्रत्येकी 1 रुपयाचा शेअर त्यांनी 500 रुपयांनी घेतला, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच, त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या खात्यात 2 कोटी, पत्नी यामिनी जाधन यांच्या खात्यात 2 कोटी, मुलगा निखिल जाधव यांच्या खात्यात 50 लाख, तर दुसरा मुलगा यतीन जाधव याच्या खात्यात 50 लाख रुपये वळते केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे.
"Shauru ट्रेडिंग कंपनीच्या खात्यात 3 कोटी रुपये, Cressida traders च्या खात्यात 2 कोटी, तसेच सुनंदा मोहिते यांच्या खात्यात 5 कोटी, असे एकूण 15 कोटी यशवंत जाधव यांनी आपल्या आणि आपल्या नातेवाईकांच्या खात्यात वळवले आहेत. आम्ही याबाबत सर्व एजन्सीला तक्रार करणार आहोत.", असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- एसटी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीनं शरद पवारांना खुलेआम चर्चा करण्यास भाग पाडलं : गोपीचंद पडळकर
- शरद पवार जनतेचा विचार करून रयतचे अध्यक्षपद सोडतील; शिवसेना आमदार महेश शिंदे यांची टीका
- हापूस आंब्यावर निसर्गाची अवकृपा, अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह