एक्स्प्लोर
Advertisement
कर्मचाऱ्यांची 'दिवाळी'... मुंबई महापालिकेकडून दिवाळीसाठी 29 हजार रुपयांचा बोनस जाहीर
मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्या चर्चेनंतर दिवाळी 2024 करिता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली 2024 निमित्त 29 हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस (Diwali) जाहीर करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने याबाबत आज घोषणा केल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांना दीपावली 2024 प्रित्यर्थ सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात महानगरपालिकेतील (BMC) विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता. त्यानंतर, राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मुंबई महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट बोनस जाहीर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्या चर्चेनंतर दिवाळी 2024 करिता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. त्याचा क्रम, तपशील आणि सानुग्रह अनुदान रक्कम खाली देण्यात आली आहे. दीपावली – 2024 करीता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱयांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. त्याचा क्रम, तपशील आणि सानुग्रह अनुदान रक्कम या क्रमाने माहिती पुढीलप्रमाणेः
१. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये 29,000/-
२. अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः रुपये 29,000/-
३. महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये 29,000/-
४. माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये 29,000/-
५. माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये 29,000/-
६. अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये 29,000/-
७. अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये 29,000/-
८. सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): भाऊबीज भेट रुपये 12,000/-
९. बालवाडी शिक्षिका / मदतनीस - भाऊबीज भेट रुपये 5,000/-
हेही वाचा
भाजपा आमदार राणा पाटलांचा कंठ दाटला; भरस्टेजवरच रडू कोसळले, उपस्थितांमध्ये शांतता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement