एक्स्प्लोर

मुंबईतल्या 499 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

यंदा मुंबई महापालिकेने मुंबईतल्या तब्बल 499 इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबई : दरवर्षी पावसाळा येतो तेव्हा सुखद सरींसोबतच दुःखद दुर्घटनांच्या बातम्यादेखील आणतो. पुण्यातील कोंढव्यातील दुर्घटना, मालाडमध्ये पडलेली भिंत, चिपळूणमध्ये फुटलेलं धरण यांसारख्या दुर्घटनांनी यंदाच्या पावसाळ्यातल्या पहिल्या काही दिवसांतच दुर्घटनांचं सत्र सुरु केलं आहे. मुंबईत दर पावसाळ्यात एखादी जुनी इमारत, एखादी सुरक्षाभिंत कोसळते आणि त्याखाली अनेक जीव दबले जातात. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी किंवा दरम्यान महापालिकेकडून काही धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. यंदा मुंबई महापालिकेने मुंबईतल्या तब्बल 499 इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यापैकी जवळपास 390 इमारतींमधील रहिवाशांना पावसाळ्यात मोठा धोका आहे. धोकादायक इमारतींपैकी केवळ 68 इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. धोकादायक इमारतींविषयी अधिक माहिती मुंबईत अतिधोकादायक वर्गात मोडणाऱ्या 499 इमारती आहेत अतिधोकादायक इमारतींपैकी एकही इमारत पूर्णत: पाडण्यात आलेली नाही. 54 धोकादायक इमारती रहिवाशांनी कोणतीही हरकत न घेता रिकाम्या केल्या आहेत. 14 इमारती रहिवाशांनी रिकाम्या केल्या आहेत. परंतु या इमारती तोडण्याची परवानगी न्यायालयाने दिलेली नाही. 174 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी महापालिकेच्या कारवाईविरोधात न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे. 65 इमारतींचे पाणी आणि वीज महापालिकेने कापली आहे. तरीदेखील लोक तिथे राहत आहेत. ...म्हणून इमारत धोकादायक असली तरी, रहिवाशी इमारत रिकामी करत नाहीत न्यायाप्रविष्ट प्रकरणे, जुन्या इमारतींचे वाद, विकासकांकडून केली जाणारी अडवणूक, फसवणूक आणि ट्रान्झिस्ट कॅम्पचा सामान्यांनी घेतलेला धसका या कारणांमुळे इमारत कितीही जर्जर झालेली असली तरी अनेक रहिवासी जागा सोडून जात नाहीत. त्यातच, मुंबईत मोक्याच्या जागांना सोन्याचा भाव आहे. मोक्याच्या ठिकाणची जागा सोडली तर पुन्हा त्या जागी घर घेणे परवडणारे नाही, त्यामुळे रहिवासी राहती जागा सोडण्यास तयार होत नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
Mumbai : धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल
लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget