एक्स्प्लोर

BMC : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत उड्डाणपुलाचे काम वेगाने पूर्ण करा; अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना

BMC : अतिरिक्‍त मनुष्‍यबळाद्वारे तीन पाळ्यांमध्‍ये कामकाज करत उड्डाणपूल उभारणीचे काम वेगाने पूर्ण करावे अशा सूचना अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दिल्या. 

मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत दिंडोशी-गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उभारणाऱ्या उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. अतिरिक्‍त मनुष्‍यबळाचा वापर करून तीन पाळ्यांमध्‍ये कामकाज करत पूल व पुलाची अनुषंगिक कामे पूर्ण करावीत.  जेणेकरून पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला होईल, असे निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील बोगदा प्रकल्‍पाच्‍या भुयारीकरणासाठी संयंत्र (टनेल बोअरिंग मशीन) ऑगस्ट महिन्यामध्ये दाखल होणार आहे. हे 'टीबीएम' संयंत्र ठेवण्‍यासाठी चित्रनगरी व्‍यवस्‍थापनाकडे भूखंड उपलब्‍ध करून देण्याकामी विनंती करण्यात आली असून महानगरपालिका अधिका-यांनी त्‍यासाठी  पाठपुरावा करावा, असेदेखील निर्देश श्री. बांगर यांनी दिले.

मुंबई महानगरातील पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा सुमारे १२.२० किलोमीटरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्‍प हाती घेतला आहे. या कामाच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यातील कामांची अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज (दिनांक ६ मार्च  २०२५) प्रत्‍यक्ष पाहणी केली. प्रमुख अभियंता (पुल) श्री. उत्‍तम श्रोते यावेळी उपस्थित होते.

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत दिंडोशी-गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान सहा पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याची उंची १, २६५ मीटर आहे.  उड्डाणपुलासाठी बॉक्स गर्डर व उच्चस्तरीय काँक्रिटचा वापर केला जात आहे. तसेच, रस्ता ओलांडण्याकरिता पादचारी पूल, स्वयंचलित सरकता जिन्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. रत्‍नागिरी जंक्‍शन येथे उड्डाणपुलाला आधार देणारे ४ उभे खांब (पिअर्स) वगळता उर्वरित काम अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. रत्‍नागिरी जंक्‍शन येथील संरचनात्‍मक अंमलबजावणी पद्धती कशी असावी याबाबत सल्‍लागार यांच्‍यासमवेत श्री.बांगर यांनी विचारविनिमय केला. तसेच, भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या (आयआयटी) अभिप्रायानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. त्‍यानंतरच प्रत्‍यक्षात अंमलबजावणी केली जाईल, असेदेखील श्री. बांगर यांनी स्‍पष्‍ट केले.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. बांगर म्‍हणाले की, सध्‍याच्‍या नियोजनानुसार, पूलाच्‍या बांधकामास ९ महिन्‍यांच्‍या कालावधी लागणार आहे. दरम्‍यानच्‍या काळात रत्‍नागिरी जंक्‍शनच्‍या दोन्‍ही बाजूस खांब उभारणी, दोन आधारस्तंभ (पिअर्स) यांच्यामधील अंतराचे (स्पॅन) काम आणि अनुषंगिक कामे पूर्ण करावीत, जेणेकरून पूल वाहतुकीस लवकरात लवकर खुला करता येईल. त्‍यासाठी कालमर्यादा दर्शविणाऱया स्तंभांच्या स्वरूपात आलेख (बार चार्ट) तयार करावा. अतिरिक्‍त मनुष्‍यबळाचा वापर करून तीन पाळ्यांमध्‍ये कामकाज करावे. एकाचवेळी एकापेक्षा अधिक चमू (टीम्‍स्) कार्यरत राहील याची दक्षता घ्‍यावी, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.

जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत पश्चिम उपनगरांमध्ये गोरेगाव स्थित दादासाहेब फाळके चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड येथे खिंडीपाडापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्येकी ४.७० किलोमीटरचे असतील. हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या डोंगराच्या खाली पूर्णपणे जमिनीखालून जाणार आहे. या भूमिगत बोगद्यामध्ये शिरण्यासाठी चित्रनगरी परिसरामध्ये पेटी बोगदा देखील बांधण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेवून तो पूर्ण करण्यात येत आहे.

भुयारीकरणासाठी साधारणत:  २०० मीटर (लांबी) बाय ३० मीटर (रूंद) बाय ३८ मीटर (खोली) च्‍या लॉ‍न्चिंग शॉफ्टचे काम सुरू आहे.त्‍याच्‍या 'पायलिंग' कामाची पाहणी देखील अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. बांगर यांनी केली.भुयारीकरणासाठी टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) ऑगस्ट महिन्यात दाखल होणार आहे. हे 'टीबीएम' संयंत्र ठेवण्‍यासाठी चित्रनगरी व्‍यवस्‍थापन जोश मैदान, वेलकम मैदान, साई मैदान उपलब्‍ध करून देणार आहे. स्‍थानिक महानगरपालिका अधिका-यांनी मैदान उपलब्‍धतेसाठी चित्रनगरी व्‍यवस्‍थापनाकडे पाठपुरावा करावा, असेदेखील निर्देश श्री. बांगर यांनी दिले. चित्रनगरी अंतर्गत विद्यमान रस्‍त्‍यालगत पर्यायी रस्‍ता विकसित केला जात आहे, त्‍याची पाहणीदेखील श्री. बांगर यांनी केली.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian Case: दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
Aurangzeb Nagpur: औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
CIA JFK assassination: अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 20 March 2025TOP : टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवानABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 20 March 2025Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्यानं NIA मार्फत चौकशी करण्याची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Salian Case: दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
Aurangzeb Nagpur: औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
CIA JFK assassination: अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
Disha Salian Case & Aaditya Thackeray: शाहरुखच्या मुलाला अटक करणारा अधिकारी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार? दिशा सालियन केसची फाईल पुन्हा उघडणार
शाहरुखच्या मुलाला अटक करणारा अधिकारी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार? दिशा सालियन केसची फाईल पुन्हा उघडणार
Sikandar Release Date: सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
Astrology : आज नीचभंग योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची राहील कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट
आज नीचभंग योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची राहील कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
Embed widget