एक्स्प्लोर
डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून 180 शस्त्र जप्त
भाजपचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णींच्या दुकानात चॉपर, तलवारी, एअरगन, फायटर्स, चाकू, सुरे आणि कुऱ्हाडी असे शस्त्रास्त्र सापडले आहेत.
कल्याण : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेने दुकानावर धाड टाकत ही कारवाई केली. कुलकर्णींकडे तब्बल 180 प्रकारची शस्त्रं सापडली आहेत.
49 वर्षीय धनंजय कुलकर्णी हे भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष आहेत. कुलकर्णींच्या दुकानात चॉपर, तलवारी, एअरगन, फायटर्स, चाकू, सुरे आणि कुऱ्हाडी अशी शस्त्रं सापडली. त्यामुळे सुसंस्कृत शहराचा टेंभा मिरवणाऱ्या डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.
धनंजय कुलकर्णींच्या नावे 'तपस्या फॅशन हाऊस' नावाचं गिफ्ट शॉप आहे. या ठिकाणी शस्त्रास्त्र विक्रीला ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दुकानावर या दुकानावर आज सकाळी धाड टाकली.
दुकानाचे मालक आणि संशयित आरोपी धनंजय कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. कुलकर्णींनी क्रॉफर्ड मार्केटमधून हे साहित्य विकत आणल्याची माहिती आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे कुलकर्णींची पोलिस कोठडी मागितली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement