एक्स्प्लोर

'हे तर 'भारतीय उखाडो' अभियान, इतिहास आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारणार'; भाजपचा हल्लाबोल 

हे भारतीय उखाडो अभियान आहे. आदित्य ठाकरे राहुल गांधींचा हातात हातात घेऊन चालत आहे. पण इतिहास तुम्हाला प्रश्न विचारणार, अशा शब्दांत शेलार यांनी हल्लाबोल केला

BJP On Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेवरुन भाजपनं पुन्हा एकदा काँग्रेससह आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, आजकाल भारत जोडो सुरू आहे. 'बेगाने शादी अब्दुल्ला दिवाना' यानुसार आदित्य ठाकरेंचा प्रचार सुरू आहे. हे भारतीय उखाडो अभियान आहे. आदित्य ठाकरे राहुल गांधींचा हातात हातात घेऊन चालत आहे. पण इतिहास तुम्हाला प्रश्न विचारणार, अशा शब्दांत शेलार यांनी हल्लाबोल केला

यावेळी आमदार आशिष शेलार  यांनी आदित्य ठाकरे यांनी भारत जोडोमध्ये घेतलेल्या सहभागावर प्रश्न उपस्थितीत करताना ते म्हणाले की, ज्या काँग्रेसने राम जन्मभूमी मंदिरसंबंधी कोर्ट केसमध्ये राम जन्मला नाही, रामाची गादी नव्हती ,रामाचा कोणता इतिहास नव्हता, भगवान राम कल्पोकल्पित आहे असे म्हणणाऱ्या काँग्रेसचा हात आदित्य ठाकरे यांनी पकडला आहे. रामसेतू बांधलाच नाही असे म्हणणाऱ्या त्या काँग्रेसबरोबर हातात हात घालून तुम्ही फिरताय इतिहास तुम्हाला प्रश्न विचारेल. कुराणमध्ये जिहाद नाही अशी शिवराज पाटील यांनी मांडणी केली. काँग्रेस गीता जिहाद आहे म्हणतो. त्या काँग्रेसचा हात हातात घेतला. देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे असे म्हणणाऱ्या काँग्रेसचा हात हातात घेवून आदित्य ठाकरे चालले आहेत. सर्जिकल स्ट्राईकवर  प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसचा हात हातात घेऊन आदित्य ठाकरे चालले आहेत. तो शर्जील उस्मानी  महाराष्ट्रात येवून हिंदूचे डोकं सडक आहे असे भाषण करणाऱ्यांसोबत असणाऱ्या राहुल गांधीचा हात हातात घेवून तुम्ही चालत आहात म्हणून इतिहास तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. औरंगजेबाच्या अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे काम उद्धव ठाकरे यांची शिवसेना करत आहे. हिंदू आणि नव हिंदू अशी मांडणी केली जात आहे. जागर त्याच्या विरोधात आहे. हिंदू मराठी आणि मुस्लिम मते भारतीय जनता पार्टीला मिळतील, असं शेलारांनी म्हटलं. 

आशिष शेलार म्हणाले की,  आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही 'सबका साथ सबका विकास' आहोत.  तुष्टीकरणाच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम मराठी मांडणी केली जात आहे मग मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता?  मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल शेलार यांनी केला. 

 शेलार म्हणाले की,   प्रत्येक वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लिम मताचं गणित जुळवलं जात आहे. सलग 25 वर्ष राज्य करून तुम्हाला जाती धर्माच्या आधारावर मतं मागण्याची वेळ का आली?  केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागा? सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? यातील काहीही त्यांना सांगता येत नाही. मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा डाव हा रडीचा म्हणजेच कलीचा डाव खेळला जात आहे. जाती आणि धर्माच्या आधारावर मतंमागण्याचा कार्यक्रम हा अजेंडा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. तेच आम्ही जागर यात्रेतून मांडत आहोत. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम सुरू आहे. हिंदुत फूट पाडण्याचे काम सुरू आहे ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा  शेलार यांनी दिला. 

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Embed widget