एक्स्प्लोर

BJP MNS Alliance : देवेंद्र फडणवीसांकडून मनसे नेत्यांचा 'आमचे सहकारी' असा उल्लेख; बाळा नांदगावकर म्हणाले, काहीही होऊ शकतं

Devendra Fadanvis : निवडणुकीच्या तोंडावर भाजप-मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच मनसे नेते भाजपच्या व्यासपीठावर  मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई दिसल्याने सर्वाच्या भूवया उंचावल्या. 

मुंबई : राज्यात भाजप आणि मनसेची युती होईल का नाही ते आताच सांगू शकत नाही, मात्र मुंबईतील समस्यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं सूचक वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केलंय. राजकारणात काहीही होऊ शकतं, भाजप आणि मनसे जर एकत्रित आले तर त्यात माझा वाटा असू शकतो असंही वक्तव्य बाळा नांदगावकरांनी केलंय. भाजपच्या 'धन्यवाद देवेंद्रजी' या कार्यक्रमानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. याच कार्यक्रमाच्या स्टेजवरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांनी बाळा नांदगावकरांचा उल्लेख आमचे सहकारी असा केल्याने मनसे आणि भाजप एकत्रित येणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

म्हाडा, एसआरएतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या सोडवल्याबद्दल  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी भाजपकडून 'धन्यवाद देवेंद्रजी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि शिशिर शिंदे उपस्थित होते. 

निवडणुकीच्या तोंडावर भाजप-मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच मनसे नेते भाजपच्या व्यासपीठावर  मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई दिसल्याने सर्वाच्या भूवया उंचावल्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाषणादरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा ‘आमचे सहकारी’ म्हणून उल्लेख करण्यात आला. 

फडणवीसांनी निरोप दिला म्हणून कार्यक्रमाला आलो

बाळा नांदगावकर म्हणाले की, मला प्रवीण दरेकरांचा फोन आला होता. फडणवीस यांनी कार्यक्रमासाठी निरोप दिला होता, बाळा भाऊंना बोलवा म्हणून. त्यानंतर या कार्यक्रमाला जा असं राज साहेबांना सांगितलं . म्हणून आपण या कार्यक्रमासाठी आलो. मुंबईच्या समस्यांवरील ही परिषद होती त्यामुळे त्यासाठी एकत्र येणं गरजेचं होतं.

राजकारणात काहीही होऊ शकतं

युती करायची नाही करायची हा पक्षप्रमुखांचा विषय आहे, हा माझा विषय नाही असं सांगत बाळा नांदगावकर म्हणाले की, भविष्यात काय होईल काही सांगता येणार नाही. राजकारणात काही अशक्य किंवा शक्य नाही.भाजप आणि मनसेची युती झाली तर अडचण होण्याचं कारण नाही. युती होऊ शकते किंवा नाही पण. आम्ही एकत्र येणार किंवा नाही येणार, निवडणुकीत चर्चा होतच असतात. मुंबईतील समस्यांसाठी तरी आता आम्ही एकत्र आलो आहोत. भविष्यात काय होणार ते नेते ठरवतील, राजसाहेब राज्यातले नेते फडणवीस ठरवतील. मात्र त्यात माझा देखील काही वाटा असू शकतो. युतीसाठी काही अडचण असण्याचं कारण नाही, आम्ही वारंवार भेटत असतो, बोलत असतो. 

ही बातमी वाचा:

Bala Nandgaonkar on BJP - MNS Alliance : मुंबईच्या समस्यांसाठी एकत्र, मनसे - भाजपची युती?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Goverment On LPG Cylinder Shortage: सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
Stuti Sonawane Death Case Mumbai: अलिबागची ट्रिप, आंबट कँडी आणि छोटा बाथटब...; आयुष्य संपवण्याआधी मुंबईकर स्तुती काय काय म्हणाली?
अलिबागची ट्रिप, आंबट कँडी आणि छोटा बाथटब...; आयुष्य संपवण्याआधी मुंबईकर स्तुती काय काय म्हणाली?
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
Embed widget