एक्स्प्लोर

शहीद राणेंना आदरांजलीऐवजी भाजप नगरसेवकाचं बर्थडे सेलिब्रेशन

शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच भाजपचे नगरसेवक आणि माजी प्रभाग समिती सभापती आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे.

मीरा रोड : काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मीरा रोडमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली. मात्र त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच भाजपचे नगरसेवक आणि माजी प्रभाग समिती सभापती यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे. विशेष म्हणजे शहराच्या महापौर डिंपल मेहता, स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह भाजप नगरसेवक, पदाधिकारी या जल्लोषात सहभागी झाले. केक खात आणि भरवत त्यांनी भाषणंही ठोकल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या सर्वांनी सोशल मीडियावर शहिद कौस्तुभ राणे यांना आदरांजली वाहणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे शहीद आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या दुटप्पी भूमिकेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी रात्री काश्मिरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोर दहशतवाद्यांशी लढताना देशाचे चार जवान शहीद झाले. यामध्ये मीरारोडच्या शीतलमधील हिरल सागर इमारतीत राहणारे 29 वर्षीय मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचाही सहभाग होता. मंगळवारी सकाळीच या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली. दुपारपासून सोशल मीडिया आणि बातम्यांमधून मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचं दाखवलं गेलं. त्यानंतर त्यांच्या मीरारोड येथील घरी दुपारपासूनच नातेवाईक आणि आप्त जमू लागले. महत्त्वाचं म्हणजे स्वत: आमदार नरेंद्र मेहतांनीही कुटुंबीयांची भेट घेऊन आले. केवळ मीरा रोडच नव्हे तर राज्य आणि देशात या चार जवानांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त केला जात असताना भाजप नगरसेवक आनंद मांजरेकर यांनी मात्र मंगळवार 7 ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस जाहीरपणे धूमधडाक्यात साजरा केला. शहीद राणे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जांगीड इस्टेट जवळील सेंट पॉल शाळेसमोर आलिशान मंडप टाकून भाजप नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जल्लोष केला. महापौर डिंपल मेहता यांच्यासह उपमहापौर चंद्रकांत वैती तसेच भाजपचे प्रशांत दळवी, दीपिका अरोरा, हेमा बेलानी, दौलत गजरे, हेतल परमार, अनिता मुखर्जी, विविता नाईक, वंदना भावसार या नगरसेवकांसह निलेश सोनी, काजल सक्सेना , सोनिया नायक, किरण चेऊलकर, सुरेश दुबे असे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मांजरेकर यांनी केक कापला. दरम्यान, मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहचलं नव्हतं, असा दावा भाजप नगरसेवर आनंद मांजरेकर यांनी केला आहे. ही माहिती मिळाली असती, तर आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन रद्द केलं असतं, असंही ते म्हणाले. पाहा व्हिडिओ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला जेलमध्ये लायब्ररी क्लर्कची नोकरी, रोज 522 रुपये मानधन
माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला जेलमध्ये लायब्ररी क्लर्कची नोकरी, रोज 522 रुपये मानधन
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न
डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न
Instagram Earning : 1000 Views ला इन्स्टाग्रामकडून किती पैसे मिळतात? जाणून घ्या क्रिएटर्स कशी कमाई करतात?
1000 Views ला इन्स्टाग्रामकडून किती पैसे मिळतात? जाणून घ्या क्रिएटर्स कशी कमाई करतात?
lalbaugcha raja ganpati visarjan : लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, उद्धव ठाकरेंचा सचिव सुधीर साळवींना फोन, कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला
लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, उद्धव ठाकरेंचा सचिव सुधीर साळवींना फोन, कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला जेलमध्ये लायब्ररी क्लर्कची नोकरी, रोज 522 रुपये मानधन
माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला जेलमध्ये लायब्ररी क्लर्कची नोकरी, रोज 522 रुपये मानधन
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न
डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न
Instagram Earning : 1000 Views ला इन्स्टाग्रामकडून किती पैसे मिळतात? जाणून घ्या क्रिएटर्स कशी कमाई करतात?
1000 Views ला इन्स्टाग्रामकडून किती पैसे मिळतात? जाणून घ्या क्रिएटर्स कशी कमाई करतात?
lalbaugcha raja ganpati visarjan : लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, उद्धव ठाकरेंचा सचिव सुधीर साळवींना फोन, कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला
लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, उद्धव ठाकरेंचा सचिव सुधीर साळवींना फोन, कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला
वनराज आंदेकरचा भाचा आयुष कोमकरचा खून होईल याचा अंदाज नव्हता: पुणे पोलीस आयुक्तांची कबुली
वनराज आंदेकरचा भाचा आयुष कोमकरचा खून होईल याचा अंदाज नव्हता: पुणे पोलीस आयुक्तांची कबुली
पाऊस की उघडीप! पुढील पाच दिवस राज्यात कसं असेल हवामान? जाणून घ्या हवामानाचा अंदाज 
पाऊस की उघडीप! पुढील पाच दिवस राज्यात कसं असेल हवामान? जाणून घ्या हवामानाचा अंदाज 
शॉर्ट सर्किटमुळं मुंबईत इमारतीला भीषण आग !  गुदमरून 80 वर्षीय महिलेचा मृत्यू, 5-6 गंभीर
शॉर्ट सर्किटमुळं मुंबईत इमारतीला भीषण आग ! गुदमरून 80 वर्षीय महिलेचा मृत्यू, 5-6 गंभीर
Pune Metro: विसर्जन मिरवणूक बघून घरी जाण्यासाठी पुणेकरांनी मेट्रोकडे धाव घेतली, मेट्रोतील तुफान गर्दीचे Video व्हायरल
विसर्जन मिरवणूक बघून घरी जाण्यासाठी पुणेकरांनी मेट्रोकडे धाव घेतली, मेट्रोतील तुफान गर्दीचे Video व्हायरल
Embed widget