एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेनेची तलवार म्यान, कर्जमुक्तीबाबत मनवण्यात भाजपला यश
मुंबई : राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेने कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरुन रान पेटवलं. उठसूठ भाजपला घरचा आहेर देत कर्जमुक्तीवरुन आक्रमक होणाऱ्या शिवसेनेची तलावर अखेर म्यान झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कर्जमुक्तीबाबत शिवसेनेची समजूत काढण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला यश आले आहे.
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यात कर्जमुक्तीबाबत राज्य सरकार एक पाऊल पुढे टाकण्याची शक्यता आहे. केंद्राकडे मोठ्या पॅकेजची मागणी करण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय, केंद्राकडे मागण्यात येणाऱ्या पॅकेजमध्ये राज्याचा हिस्सा किती असेल, याबाबत सविस्तर भूमिका सरकार आज मांडण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दिल्लीतून परतल्यानंतर रात्री उशिरा कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवेसनेला मनवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मंजूर करुन घेतला. शिवाय, विधानपरिषदेत शिवसेनेचे मंत्री आणि राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर हे अर्थसंकल्प मांडणार असल्याचे स्पष्ट संकेत कालच दिले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement