(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुनच सचिन वाझे दोन कोटी वसुली करायचा", बिमल अग्रवाल यांचा आरोप
परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुनच सचिन वाझे दोन कोटी वसुली करायचा, असा आरोप बिमल अग्रवाल यांनी केला आहे. या संदर्भातील ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात आणखी एक वसुलीचा गुन्हा नोंद झालाय. बिमल अग्रवाल या व्यापाऱ्यानं 9 लाखांच्या वसुलीचा आरोप करत गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. या गुन्ह्यात परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा नोंद झालाय. जानेवारी 2020 ते मार्च 2021 या काळात सर्व आरोपींनी आपल्याकडून 9 लाख वसूल केल्याचा आरोप तक्रारदार बिमल अग्रवाल यांनी केला.
विमल अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जानेवारी-फेब्रुवारी 2020 ते मार्च 2021 दरम्यान आरोपींनी त्यांच्याकडून 9 लाख रुपयांची वसूली केली. अग्रवाल यांनी सांगितलंय की, त्यांच्या भागिदारी गोरेगावमध्ये BOHO रेस्टॉरंट अँड बार आणि अंधेरीच्या ओशिवारामध्ये BCB रेस्टॉरंट अँड बार आहे. हा बार चालवण्यासाठी सचिन वाझे आणि दुसऱ्या आरोपींनी 9 लाख रुपये आणि सॅमसंग कंपनीचा फोल्ड 2 मोबाईल हफ्ता म्हणून घेतला होता.
विमल अग्रवाल आणि एपीआय सचिन वाझे यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे
या ॲाडिओ क्लिप मध्ये सचिन वाझे हा कोड वर्ड मध्ये विमल अग्रवाल याच्याशी बोलत आहे. 2 किलो कुरिअर या कोडचा अर्थ 2 कोटी रुपये आहे. या ॲाडिओ क्लिपमध्ये विमल अग्रवाल हा त्याच्या मित्रावरील केस मागे घ्यायला वाझेला विनंती करत आहे. सचिन वाझे यांच्या भावाचे निधन झाले त्यावेळेस विमल अग्रवालने वाझेला फोन केला होता सांत्वन करण्याकरता पण त्याही वेळेस वाझेने पैशांचा विषय केला. विमलने वसूली बाबत वाझेला फोन केला होता त्यावेळेस 5-7 लाख रुपयांत सेटलमेंट करुन टाका असं विमल हा वाझेला सांगतोय पण एवढ्या पैशांत चंटर पंटर सेटलमेंट करतात असं वाझे बोलतोय असा आरोप बिमल अग्रवाल याचा आहे.
क्रिकेट बुकींकडून पैसे कसे गोळा करता येतील ते किती द्यायला तयार आहेत हे वाझेला सांगतोय तेव्हा पैसे कसे पाहिजेत हे वाझे विमलला सांगतोय. क्लिपमध्ये क्रिकेट बुकी मित्तल बाबत सेटलमेंट करण्या संदर्भात विमल आणि सचिन वाझे यांचे बोलणे झाले आहे. क्रिकेट बुकी मित्तल याने अप्लेश नावाच्या कोणा एका व्यक्तीकडे पैसे दिले होते पण तो व्यवहार झाला नाही असं वाझे बिमलला सांगतोय.
या क्लिप मध्ये दोन बुकींना अटक करु नये यासाठी पैसे घ्यावेत सेटलमेंट करा असं विमल सांगतोय. वाझेला पण उद्या 12 पर्यंत कर असं वाझे सचिन वाझेला सांगतोय याचा अर्थ 12 वाजेपर्यत पैसे पाठव नाही तर त्यांना अटक करतो असं वाझे बोलतोय असं विमल अग्रवाल सांगतोय
बुकींशी पैशांबाबत बोलणे झाल्यावर विमलने वाझेला फोन करुन सांगितले व्यवहार डन झाला त्यावेळेस वाझे विमलला विचारतो किती पैसे देतो. विमल आपल्या मित्राला अटक करु नये अशी विनंती वाझेला करतोय आणि यांत एकूण 12 बुकींना वॉन्टेड दाखवले आहे असही वाझे फोन वर विमलला सांगतोय असं विमललचे म्हणणे आहे.