एक्स्प्लोर

भिवंडीतील टोरेंट कंपनीवर मनपाची कारवाई, मुख्य कार्यालय सील

भिवंडी : संपूर्ण भिवंडी शहरातील सामान्य नागरिकांना वीज चोरीच्या खोट्या केसेसमध्ये फसवून बदनामी करणाऱ्या टोरेंट पावर कंपनीवर जप्ती होण्याची नामुष्की ओढवली आहे. नुकतेच पालिकेच्या पथकाने टोरेंट पावर कंपनीचे अंजूर फाट्यावरील कार्यालय सील केला आहे. 176 कोटी 50 लाख थकबाकी भरली नसल्यामुळे भिवंडी महानगरपालिकेने कारवाई केली. महापौर तुषार चौधरी यांच्या प्रयत्नाने आणि आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार मनपाचे उप-आयुक्त दिपक कुरळेकर, करमुल्यांकन अधिकारी, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे अधिकारी, कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली भिवंडीमध्ये वीज वितरण व वीज बिल वसूल करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीने गेल्या दहा वर्षांपासून महानगरपालिकेला वापर भाडे कर न दिल्याने भिवंडी पालिकेने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी टोरेंट कंपनीला 176 कोटी 50 लाख 92 हजार 616 रुपये कर भरण्याची नोटीस बजावली होती. टोरेंट कंपनीने पालिकेच्या नोटिसी कडे दुर्लक्ष केल्याने उच्चन्यायालयाच्या निर्देशा नुसार येत्या दोन दिवसात टोरेंट कंपनीवर जप्तीची नोटीस लावून मालमत्ता लिलाव करणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे यांनी पत्रकांशी बोलताना सांगितले. 26 जानेवारी 2007 ला राज्य शासनाकडून भिवंडी शहराचा वीज वितरण व वीज बिल वसुलीचा ठेका टोरेंट कंपनीला शासनाने दिला आहे. या दहा वर्षाच्या कालावधीत या कंपनीने रस्त्यावरील एसटी ,एलटी पोल ट्रान्स्फार्मर ,जमिनीतून टाकण्यात आलेल्या केबल आदींचे भाडे भिवंडी महापालिकेला आजपर्यंत आदा केलेले नाही. त्यामुळे पालिकेचे प्रचंड नुकसान झाले आहे. पालिकेने टोरेंट कंपनीला सन 2007 पासून या संदर्भात वारंवर नोटिसा बजावण्यात आले. तरी कंपनीने पालिकेचा कर भरलेला नाही. त्यामुळे आता भिवंडी पालिकेने टोरेंट कंपनीवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणारZero hour Dasara Melava : कुणाच्या मंचावरुन होणार सामाजित प्रबोधन? ठाकरे काय बोलणार?Zero Hour Guest Centre Ganesh Sawant | नारायणगडावर दसरा मेळावा, जरांगे मराठ्यांचे नेते होणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget