एक्स्प्लोर
भेंडीबाजार इमारत दुर्घटना : बचावकार्य थांबवलं, 34 मृतदेह हाती
भेंडीबाजारात पाकमोडिया स्ट्रीटवरील काल सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास 125 वर्ष जुनी असलेली पाच मजली हुसैनी इमारत काही क्षणात कोसळली.
मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटनेचं बचावकार्य अखेर 28 तासानंतर थांबवण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या अथक प्रयत्नांनंतर 34 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये 20 दिवसांच्या बाळासह तीन वर्षांच्या दोन मुली आणि सहा वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे. तर 15 जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हुसैनी इमारत जमीनदोस्त
भेंडीबाजारात पाकमोडिया स्ट्रीटवरील काल सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास 125 वर्ष जुनी असलेली पाच मजली हुसैनी इमारत काही क्षणात कोसळली. या इमारतीच्या खाली असलेल्या गाळ्यांमध्ये आजूबाजूच्या हॉटेलात काम करणारे लोक राहात होते. काही ठिकाणी जेवण बनवण्याचं कामही होत होतं. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर पाच कुटुंबं वास्तव्यास होती. 12 खोल्या आणि 20 गोदामं इमारतीत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे याच इमारतीत एक प्ले स्कूलही चालवण्यात येत होतं, जे 10 वाजता सुरु व्हायचं. पण त्याआधीच इमारत कोसळल्याने अनेक चिमुकल्यांचे जीव वाचले आहेत.
LIVE : भेंडीबाजार दुर्घटना : मृतांचा आकडा 34 वर
अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिस बचावकार्यात
इमारत कोसळल्याची माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या दोन तुकड्या बचावकार्यासाठी दाखल झाले होते. बचावकार्य सुरु असताना अग्निशमन दलाचा एक, तर एनडीआरएफच्या पथकातील 6 जवान जखमी झाले.
इमारत कोसळल्यानंतर आजूबाजूच्या तीन इमारतींना तडे गेले होते. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं.
इमारत दुर्घटनेची चौकशी होणार
म्हाडाने 2011 मध्येच धोकादायक इमारतीची नोटीस दिल्यानंतरही मालकी असणाऱ्या ट्रस्टने इमारतीचा पुनर्विकास रखडवल्याचा आरोप होत आहे. इमारत दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असून म्हाडाच्या उपमुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
मुंबईतील भेंडीबाजार इमारत दुर्घटना : 24 तासांचे अपडेट्स
'सेस' प्राप्त इमारत
हुसैनीवाला इमारत ही उपकरप्राप्त (सेस) इमारत होती. म्हाडा’च्या अंतर्गत ही इमारत येत होती. 2013 साली इमारतीला नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर काही रहिवासी इथून निघून गेले, तर काही जण मात्र इथेच राहत होते.
‘या भागातील अनेक इमारती खूप जुन्या म्हणजे कमीत कमी 50 वर्षांपूर्वीच्या आहेत. मुंबईत झालेल्या जोरदार पावसाच्या तडाख्याने आधीच जुन्या-जर्जर झा इमारतींना धोका निर्माण झाला आहे.
50 ते 100 वर्षांपूर्वीच्या ज्या इमारतींमध्ये मालकांनी पागडी सिस्टीमवर किंवा डिपॉझीट सिस्टीमवर भाडेकरु ठेवले, ते वर्षानुवर्ष तिथे राहत आहेत. या इमारतींची दुरुस्ती करणं मालकांना परवडत नव्हतं. 1976 साली महाराष्ट्र शासनानं नवा कायदा केला आणि विशेष करांअंतर्गत या इमारती दुरुस्त कराव्यात असं म्हटलं. अशा इमारतींना सेस, म्हणजे उपकर लागू होतो.
ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये होती. सेस इमारतींची देखभाल करणं, दुरुस्ती करणं ही जबाबदारी म्हाडाची आहे.
PHOTO : हुसैनी इमारत दुर्घटनेचे 12 फोटो
PHOTO : मुंबईतील भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली
कोसळलेली इमारत नेमकी कशी होती?
इमारतीचं नोंदणीकृत नाव - हुसैनी इमारत
मूळ इमारत 3 मजली, त्यावर 3 मजले नंतर बांधले
तळमजल्यावर - अनिवासी गाळा/ गोडाऊन
1. पहिल्या मजल्यावर 4 खोल्या
2. दुसऱ्या मजल्यावर 1 खोली
3. तिसऱ्या मजल्यावर 1 खोली
4. चौथ्या मजल्यावर 1 खोली
5. पाचव्या मजल्यावर 1 खोली
6. सहाव्या मजल्यावर 1 खोली
गेल्या महिन्याभरातील मुंबईत इमारत कोसळण्याची ही तिसरी दुर्घटना आहे. 26 जुलै 2017 रोजी घाटकोपरमध्ये साईदर्शन ही इमारत पडली होती. तर गेल्या आठवड्यात चांदिवलीत इमारत कोसळली होती.
संबंधित बातम्या
मुंबईतील भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली
LIVE : भेंडीबाजार इमारत दुर्घटना
भेंडीबाजार दुर्घटना : आमचं घरही व्हायब्रेट झालं, दाऊदच्या भावाची मुलाखत जशीच्या तशी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement