एक्स्प्लोर

Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?

Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना येण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरात (Bhandup Railway Station) दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर (Bus Accident) प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी महत्त्वाच्या उपाययोजना अमलात आणल्या आहेत. अपघातानंतर स्थानकाबाहेरील वाढती गर्दी आणि तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेता रिक्षांना थेट स्टेशन प्रवेशद्वारापर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस ठराविक अंतरावर सीमारेषा आखण्यात आली असून ती ओलांडणाऱ्या रिक्षाचालकांकडून 1,500 रुपयांचा दंड आकारला जात आहे. या निर्णयामुळे रिक्षांच्या अनियंत्रित गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळाल्याचे दिसून येत आहे.

Bhandup Railway Station : फेरीवाल्यांवर कारवाई; रस्ते मोकळे

अपघातापूर्वी स्थानक परिसर फेरीवाल्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे पादचारी आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत फेरीवाल्यांवर कारवाई केली आणि रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी रिक्षांची अनियंत्रित वर्दळ ही मुख्य समस्या कायम होती. नव्या बंदीनंतर मात्र वाहतूक कोंडीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Bhandup Railway Station : बेस्ट बसचे धोकादायक वळण कायम

दरम्यान, BEST बसचे स्थानकाबाहेरील धोकादायक वळण हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. बस प्रवाशांच्या रांगेजवळील फुटपाथलगत वळण घेत असल्याचे चित्र आजही दिसून येते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवाशांनी रिक्षा बंदीचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत रिक्षाचालकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Bhandup Railway Station : फलाट क्रमांक 1 वर छताचे काम अपूर्ण

स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वरील छताचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी अर्ध्या फलाटावर प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत आहे. काही प्रवासी छत्र्यांचा किंवा जवळील शेडचा आधार घेताना दिसतात, तर काही जण उन्हापासून बचाव करण्यासाठी छपराखाली थांबून ट्रेन येताच धाव घेताना दिसतात. एकीकडे वाहतूक नियंत्रणासाठी प्रशासन सक्रिय झाले असले, तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि मूलभूत सुविधांसाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Who Is Milind Shenoy Maharashtra Minority Department: एकीकडे अजितदादांचं निधन, दुसरीकडे तातडीने अल्पसंख्याक दर्जांचं प्रमाणप्रत्र वाटप; सही करणारे मिलिंद शेणॉय कोण?

Sunetra Pawar: अजितदादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात सह्यांचा सपाटा, सुनेत्रा पवारांकडून चौकशीचे आदेश; म्हणाल्या, शाळांना चुकीच्या पद्धतीने...

महत्त्वाच्या बातम्या

Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Embed widget