मुंबईकरांचा प्रवास महागला! उद्यापासून बेस्ट बसच्या दरात दुप्पट वाढ, जाणून घ्या नवीन दर
मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांचा बस प्रवास आता महाग (Mumbai Best Fare Hike) होणार आहे. बेस्ट बसच्या प्रवासभाड्यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांचा बस प्रवास आता महाग (Mumbai Best Fare Hike) होणार आहे. बेस्ट बसच्या प्रवासभाड्यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ इद्यापासून ( 9 मे 2025) पासून लागू करण्यात येणार आहे. दरम्यान या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार आहे.
1. प्रवास भाडेटप्प्यात बदल :
विद्यमान भाडेसारणीमध्ये 5,10,15, व 20 कि.मी. अंतरावर भाडेटप्पा देण्यात आले होते. तथापी प्रस्तावित भाडेतक्त्यामध्ये 5,10,15,20, 25,30,35,40,45 व 50 कि.मी. व त्यानंतर प्रत्येक 5 कि.मी. अंतरावर भाडेटप्पा देण्यात आलेले आहेत.
2. विना वातानुकूलित बससेवा :
5 कि.मी. अंतरापर्यतचे किमान प्रवासभाडे 5 रुपयावरुन 10 रुपये करण्यात आले आहे.
3. वातानुकूलित बससेवा :
5 कि.मी. अंतरापर्यंतचे किमान प्रवासभाडे 6 रुपयावरुन 12 रुपये करण्यात आले आहे.
4. सवलतीचे प्रवास भाडे :
विद्यमान प्रवासभाड्यात 12 वर्षे वयापर्यतच्या मुलांना सवलतीच्या प्रवासभाड्याची तरतूद उपलब्ध नाही. परंतू, नवीन सुसूत्रीकरणादरम्यान 5 ते 12 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना प्रवासभाड्यात सवलतीची तरतूद करण्यात आली आहे.
5. दैनंदिन / मासिक बसपास
या दैनदिन / मासिक बसपासच्या सहाय्याने प्रवासी मुंबई शहर, उपनगरे तसेच बेस्ट उपक्रमाचे बसप्रवर्तन कार्यरत असलेल्या संपूर्ण प्रवर्तन क्षेत्रामध्ये अमर्याद प्रवास करु शकतील. दैनंदिन बसपासचे शुल्क रु.60/- वरून रु.75/- करण्यात आलेले आहे. व मासिक शुल्क रु.900/- वरुन रु.1800/- करण्यात आलेले आहे.
6. शालेय विद्यार्थ्यांकरीता बसपास :
उपक्रमाच्या बससेवांवर खासगी शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ यामधून शिक्षण घेणाऱ्या वयोमर्यादा 26 वर्षाखालील विद्यार्थ्यांना विद्यमान सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या बसपासच्या मुल्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
7. महापालिका शाळेतील गणवेषधारक विद्यार्थी :
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उपक्रमाच्या बसगाड्यांमधून मोफत प्रवासाची सुविधा विद्यमान पध्दतीने CHALO स्मार्टकार्डच्या सहाय्याने देण्यात येणार आहे.
8. ठराविक अंतराचे बसपास :
प्रवासी त्यांनी निश्चित केलेल्या अंतरादरम्यान ठराविक बसफेऱ्यांसाठी साप्ताहिक आणि मासिक पासचा वापर करुन प्रवास करू शकतात.
बेस्टच्या आर्थिक डबघाईवर तोडगा काढण्यासाठी ही भाडेवाढ
बेस्टच्या आर्थिक डबघाईवर तोडगा काढण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे अगोदरच वाढत्या महागाईने वैतागलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. अनेक सामान्य नागरिक रिक्षा, टॅक्सी अशा खासगी वाहनांऐवजी माफक दरात वाहतूक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट बसला पसंती देतात. मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये बेस्ट बसला शेअर टॅक्सी आणि शेअर ऑटो रिक्षाचा पर्याय आहे. मात्र, शेअर रिक्षा आणि टॅक्सीचे भाडेही मुंबईतील अनेक गरीब वर्गाला परवडत नाही. त्यामुळे हे लोक तासनतास बसच्या रांगेत उभे राहून प्रवास करतात. मात्र, आता बेस्ट बसच्या तिकीटाच्या दरात दुप्पटीने वाढ झाल्याने सर्वसामान्य वर्गाला मोठा फटका बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या:



















