एक्स्प्लोर
Advertisement
औरत जितनी नंगी, उतना उसे फॅशनेबल कहा जाता है : अबू आझमी
मुंबई : महिला जेवढी नग्न, तेवढं तिला फॅशनेबल समजलं जातं, असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख आमदार अबू आझमी यांनी केले. बंगळुरुमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्टीदरम्यान एका महिलेचा विनयभंग झाला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना अबू आझमी यांनी अकलेचे तारे तोडले.
महिलांच्या मते नग्नता हीच फॅशन आहे. बंगळुरुमधील प्रकारालाही तंग कपडे कारणीभूत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केले. याआधी याच प्रकरणावर बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनीही वादग्रस्त विधान केले होते. जी. परमेश्वर म्हणाले, "पाश्चिमात्य विचार या सर्व प्रकाराला जबाबदार आहे.". यानंतर आता समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख अबू आझमी यांनीही वादग्रस्त विधान केले आहे.
बंगळुरुमध्ये ब्रिगेड रोड आणि एम. जी. रोडच्या जंक्शनवर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या भागात पोलिस तैनात असतानाही एका महिलेच्या विनयभंगाची घटना घडली.
https://twitter.com/ANI_news/status/816204441334358016
हल्ली महिला जितकी नग्न दिसते, तितकं तिला फॅशनेबल म्हटलं आहे, असे अबू आझमी म्हणाले. आझमी पुढे म्हणाले, "माझी बहिण किंवा मुलगी रात्रीचं अनोळखी पुरुषासोबत बाहेर पडते आणि त्यावेळी तिच्यासोबत भाऊ किंवा पती नसेल. तर हे बरोबर नाही." असेही अबु आझमी म्हणाले. शिवाय, पेट्रोल असेल तिथे आग भडकणारच आणि साखर असले, तिथे मुंग्या येणारच, असे वादग्रस्त विधान अबू आझमी यांनी केले.
माझ्या बोलण्यानंतर अनेकजण नाराज होतील. पण हेच वास्तव आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचं पालन करा, ती आचरणात आणा. आपल्या कुटुंबीयांसोबतच घराबाहेर पडा, असा सल्लाही अबू आझमी यांनी दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement