एक्स्प्लोर

बुलेट ट्रेनआधी मुंबईच्या लोकलकडे लक्ष द्या!

मोठा गाजावाजा करुन पंतप्रधान मोदींनी बुलेट ट्रेनचं काही दिवसांपूर्वीचं उद्घाटन केलं. मात्र, आता या दुर्घटनेनंतर मुंबईकरांनी बुलेट ट्रेन नको पण लोकलसाठी पायाभूत सुविधा द्या. अशी जोरदार मागणी केली जात आहे.

मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 22 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर आता अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. मोठा गाजावाजा करुन पंतप्रधान मोदींनी बुलेट ट्रेनचं काही दिवसांपूर्वीचं उद्घाटन केलं. मात्र, आता या दुर्घटनेनंतर मुंबईकरांनी बुलेट ट्रेन नको पण लोकलसाठी पायाभूत सुविधा द्या. अशी जोरदार मागणी केली जात आहे. बुलेट ट्रेनआधी मुंबईत रेल्वेच्या पायाभूत सुविधांची गरज : एल्फिन्स्टन आणि परळ स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या आणि तुफान गर्दी झाली. पुलावरुन खाली उतरताना अचानक पत्रा तुटल्याचा आवाज आला. त्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले आणि चेंगराचेंगरी झाली. अवघ्या काही मिनिटात झालेल्या दुर्घटनेत 22 जणांचा जीव गेला. रेल्वे पोलीस, रुग्णवाहिकांना वर्दी दिली. पण गर्दी प्रचंड असल्यानं मृतदेह पायऱ्यांवरुन बाहेर काढताना बरीच दमछाक झाली. लोकांनीच एकमेकांना मदत केली आणि 32 जखमींना रुग्णालयात दाखल केलं. एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवरील पूलआणि जिने अतिशय अरुंद त्यात आपत्कालिन सोयींची वानवा यामुळे आज 22 जणांना आपला जीव गमवावा लागला. एकीकडे पायाभूत सुविधांची कमतरता असताना दुसरीकडे बुलेट ट्रेन सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे आता सरकारवर जोरदार टीका सुरु आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पियुष गोयल मुंबईकरांना नव्या 60 गाड्यांचं गिफ्ट देण्यासाठी आले होते. पण  त्यांनी थेट केईएम रुग्णालय गाठलं. लोकलनं रोज 70 लाख लोकं प्रवास करतात. गेल्या 9 महिन्यात 480 लोकांचा लोकल अपघातात जीव गेला आहे. वर्षाला हा आकडा तीन हजाराच्या आसपास असतो. तीनही लोकल मार्गांवर धोकादायक असे अनेक स्पॉट्स आहेत. जिथं मृत्यू दबा धरुन बसला आहे. त्यामुळे एकदा विचार करा. महत्वाचं काय आहे? मुंबईकरांचा जीव, इथली लोकल व्यवस्था की बुलेट ट्रेन? संबंधित बातम्या : एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं? एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत?

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Embed widget