एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बँकेच्या कर्मचाऱ्यांमुळे लॉटरीचं अमिष दाखवून लुबाडणारा जेरबंद
राकेशने अनेक बँकेतील ग्राहकांची फेक टेलिफोन कॉलच्या माध्यमातून फसवणूक केली आहे. हा आरोपी लॉटरीमध्ये बक्षीस जिंकल्याचे आमिष दाखवून बँकेत लॉटरीच्या रक्कमेची काही टक्के रक्कम डिपॉझिट करायला सांगत असे, अशी तक्रार तेलंगाणा सायबर गुन्हे विभागाकडे दाखल करण्यात आली होती.
मुंबई: गोरेगाव पश्चिमला असलेल्या युको बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना लॉटरीचं आमिष दाखवून पैसे लुबाडणाऱ्या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. हा आरोपी अनेकांना कॉल करून लॉटरी जिंकल्याचं आमिष दाखवायचा आणि डिपॉझिट युको बँकेच्या खात्यात जमा करण्यास सांगायचा. तेलंगाणा सायबर सेलने बँकेला अलर्ट केल्यानंतर या आरोपीला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलीसांच्या स्वाधीन केलं आहे. राकेश शॉ असं या आरोपीचं नाव आहे.
राकेशने अनेक बँकेतील ग्राहकांची फेक टेलिफोन कॉलच्या माध्यमातून फसवणूक केली आहे. हा आरोपी लॉटरीमध्ये बक्षीस जिंकल्याचे आमिष दाखवून बँकेत लॉटरीच्या रक्कमेची काही टक्के रक्कम डिपॉझिट करायला सांगत असे, अशी तक्रार तेलंगाणा सायबर गुन्हे विभागाकडे दाखल करण्यात आली होती. त्यांनतर सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार युको बँकेच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने हा आरोपी असल्याचे लक्षात येताच बँकेचे सेंटर बंद केले. यानंतर गोरेगावच्या स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. दुसऱ्याच दिवशी तेलगांना पथक मुंबईत दाखल झाले. त्यांनी आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले. या आरोपीकडे वेगवेगळ्या बँकांचे ४१ चेक, १६ एटीएम कार्ड व पॅनकार्ड आढळून आले आहेत.
टेलिफोन मार्केटिंगच्या फोन कॉलवर कोणतीही गोपनीय माहिती देऊ नका, अशा सूचना सर्वच बँकांकडून ग्राहकांना सतत दिल्या जातात. मात्र काही ग्राहक या फोन कॉलच्या आमिषाला बळी पडतात आणि आपली गोपनीय माहिती दुसऱ्यांना देतात. यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement