एक्स्प्लोर

मुंबईत लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी, महापालिकेची नवी नियमावली

मुंबईत लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी असेल. लक्ष्मीपूजनाला संध्याकाळी केवळ खासगी क्षेत्रात म्हणजेच सोसायटी किंवा घराच्या अंगणात सौम्य स्वरुपाच्या फटाक्यांना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे.

मुंबई : 'प्रकाशाचा आणि आनंदाचा सण' अशी ओळख असणारी 'दीपावली' आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पंरतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लक्ष्मपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी घातली आहे. लक्ष्मीपूजनाला केवळ खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाच्या फटाक्यांना परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणी फटाके किंवा आतषबाजीला बंदी असेल. मुंबई महापालिकेने याबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायदा -1897 अंतर्गत कारवाई केली जाईल, असं महापालिकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

'कोविड-19' च्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचं असल्याचं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. फटाक्यांच्या धुराचा कोरोनाबाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणे किंवा आतषबाजी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईकरांना केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाचे फटाके म्हणजेच फूलबाजी, अनार, भुईचक्र यांसारखे फटाके फोडता येणार आहेत.

फटाके फोडणे/आतषबाजीबाबत

• 'कोविड - 10' बाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो आणि त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची संभाव्यता असते; ही संभाव्यता लक्षात घेऊन आणि फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाही किंवा तत्म स्वरुपाची आतषबाजी महापालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही.

• हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यावसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतषबाजी आणि त्या संबंधिचे कार्यक्रम करता येणार नाहीत.

• वरील दोन्ही बाबत नियमभंग करणाऱ्यांवर महानगरपालिका आणि पोलिसाद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल.

• मात्र दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी केवळ सोसायटीचे अंगण/घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरुपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी/ झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी 'कोविड' विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यायची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे आणि साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यायची आहे.

• 'कोविड'च्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायजर हे ज्वलनशील असण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीचे दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात आतषबाजी करताना आणि फटाके फोडताना हाताला सॅनिटायजर लावलेले नसल्याची खात्री करुन घ्यावी. या प्रसंगी सॅनिटायजरच्या संपर्कात येणे टाळावे किंवा सॅनिटायजरचा वापर करु नये. तसेच सॅनिटायजरची बाटली अगर कुपी आपल्याजवळ बाळगू नये.

•वरील संदर्भानुसार या प्रसंगी खबरदारीची उपाययोजना म्हणून हात स्वच्छ करताना सॅनिटायजरऐवजी साबण आणि पाण्याने हात योग्यप्रकारे आणि नियमितपणे धुण्यास प्राधान्य द्यावे.

• वर नमूद केल्यानुसार केवळ दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी संध्याकाळी लहान मुले फुलझडी अगर अनार फटाके फोडणार असल्यास ती पालकांच्या/मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे बंधनकारक आहे. तसेच अशावेळी पाण्याने भरलेली मोठी बादली, साबण आणि सुती रुमाल अगर पंचा सोबत असावा.

संबंधित बातम्या

'कोविड' विषयक घ्यायची महत्त्वाची खबरदारी

• 'कोविड'च्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला यंदाचा दिवाळसण साजरा करताना फिजिकल डिस्टन्स पाळणे, वारंवार साबणाने योग्यप्रकारे हात धुणे आणि घराबाहेर पडताना किंवा घरी पाहुणे आले असल्यास त्यांच्यासह सर्वांनी योग्यप्रकारे मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे.

• यंदाच्या दिवाळीत दरवाजाजवळ रांगोळी काढताना अगर दिवे लावताना त्यासोबतच आठवणीने पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजाजवळ ठेवायचा आहे. जेणेकरुन, घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात-पाय-चेहरा धुवूनच घरात प्रवेश करता येईल.

• यावर्षीची दिवाळी ही नियंत्रित स्वरुपात साजरी करायची असल्याने दिवाळीच्या काळात कोणत्याही प्रकारचे सामाजिक एकत्रिकरण (Social Gathering) टाळावे.

• दिवाळीच्या काळात फराळासाठी परिचितांच्या/नातेवाईकांच्या घरी जाणे टाळावे. दिवाळीच्या शुभेच्छा या फोनद्वारे किंवा व्हिडीओ कॉलद्वारे (Online Video Conferencing) द्याव्यात.

• वरीलनुसार भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो व्हिडीओ कॉलद्वारे (Online Video Conferencing) ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.

• अपवादात्मक प्रसंगी एखाद्या घरी जाणे आवश्यक असल्यास घरात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय आणि चेहरा इत्यादी व्यवस्थितपणे साबण लावून धुवून घ्यावा. त्यानंतर ओले हात, पाय पुसण्यासाठी ज्यांच्या घरी गेलो आहोत, त्यांचा रुमाल वापरण्याऐवजी स्वतःचा रुमाल वापरावा. तसेच घरात प्रवेश करताना आणि प्रवेश केल्यानंतर मास्क परिधान करावा.

• दिवाळीकरता काही खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी आणि कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे.

Special Report | दिवाळीच्या दिवसांत कोरोनाची संक्रात नको; फटाके फोडण्यापूर्वी हा रिपोर्ट बघाच

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Monsoon Diseases : मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget