Baba Siddique : विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांचे नेते टार्गेटवर? आधी सचिन कुर्मी, आता बाबा सिद्दीकी यांची हत्या
Baba Siddique News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला.
Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. प्राथमिक माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. ज्यामध्ये त्याचा मुत्यू झालेचे वृत्त समोर आले आहे.
लिलावती रुग्णालयात बाबा सिद्दीकी यांच्यावर उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसआधी मुंबईतील भायखळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते सचिन कुर्मी उर्फ मुन्ना यांची रात्री भायखळा परिसरात काही लोकांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांचे नेते टार्गेटवर आहे का असे प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोण होते बाबा सिद्दीकी ?
तीन वेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबार मुत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची खास ओळख आहे. बाबा सिद्दीकी यांनी आपली राजकीय कारकीर्द भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून सुरू केली आणि जवळपास पाच दशके राजकारणात सक्रिय राहिले. अलीकडेच त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
बाबा सिद्दीकी हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी बॉलिवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली होती. 2013 मध्ये आयोजित एका इफ्तार पार्टीत, त्याने शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील अनेक वर्षांपासूनची दुरावा संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
कशी घडली घटना?
- बाबा सिद्दीकी 9.15 च्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडले.
- गोळीबार झाला तेव्हा बाबा सिद्दीकी त्यांच्या कार्यालयाजवळ फटाके फोडत होते.
- फटाके फोडत असताना अचानक कारमधून तिघेजण बाहेर आले.
- हे तिघे तोंडाला रुमाल बांधून आले होते. यानंतर त्याने बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. गोळी त्याच्या छातीत लागली.
- बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ गोळीबार झाला.
- बाबा सिद्दीकीच्या साथीदाराच्या पायाला गोळी लागली होती.
गोळी लागल्याने बाबा सिद्दीकी खाली पडला. यानंतर लोकांनी त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल केले.
काही दिवसआधी सचिन कुर्मी यांची हत्या...
काही दिवसआधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचे भायखळा विधानसभा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी ऊर्फ मुन्ना यांची मध्यरात्री हत्या करण्यात आली. दोन ते तीन लोकांनी धारदार हत्याराने त्याची हत्या केले होती.
हे ही वाचा -
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?