Audi Chaiwala : ही पोरं 'ऑडी' कारमधून विकतायत चहा; 'ऑडी चायवाला'ची सोशल मीडियावर तुफान चर्चा, तुम्ही प्यायलायत का?
Audi Chai Wala Video : मुंबईमधील दोन तरुण चक्क ऑडी कारमधून चहा विकत आहेत. या ऑडी चहा आणि ऑडी चायवाल्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
Audi Tea Seller : चहा (Tea) हा अनेकांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी देशविदेशातही चहाप्रेमी सर्वदूर पसरलेले आहेत. काही लोकांसाठी दिवसाची सुरुवात चहाने होते. त्यातच मुंबई आणि चहाचं विशेष नातं आहे. चहाच्या टपरीची बात काही औरच... त्या छोट्याशा टपरीवर रंगणाऱ्या गप्पाही विशेष असतात. पण हाच चहा तुम्हाला एखाद्या लक्झरी कारमधून मिळाला आणि तेही महागड्या ऑडीतून तर... मुंबईमधील दोन तरुण चक्क ऑडी कारमधून चहा विकत आहेत. हा 'ऑडी चायवाला' आणि 'ऑडी चहा'ची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
ही पोरं विकतायत 'ऑडी' कारमधून चहा
ऑडी गाडी वापरणे म्हणजे प्रतिष्ठा… लाखोंच्या ही लक्झरियस कारमधून फिरणं म्हणजे शान समजली जाते. मात्र, मुंबईत चक्क दोन तरुण या लक्झरी ऑडी कारचा उपयोग चहाच्या विक्रीसाठी करत आहेत. सोशल मीडियावर ही ऑडी चहा प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल असलेल्या या 'ऑडी चहा'ची चव चाखण्यासाठी मुंबईचा कानाकोपऱ्यातून लोक इथे चहा पिण्यास येतात आणि या 'ऑडी चहा'चे कौतुक करतात.
ऑडी चायवालाची सोशल मीडियावर तुफान चर्चा
मूळचा पंजाबच्या मलेरकोट येथील अमित कश्यप आणि हरियाणाच्या हिस्सारी मंगलीतील मनु शर्मा मुंबईत बॉलीवुडमध्ये अभिनेते बनायला आले. मुंबईत एक दिवस चहाच्या शोधात फिरत असताना त्यांना मुंबईमधील चहा विक्रीच्या व्यवसायाचं महत्त्व कळलं. मुंबईत आधीच चहा विक्री करणारे अनेकजण आहेत. आपण काही वेगळी शक्कल लढवावी म्हणून या दोघांनी 'ड्रिंक लक्झरी, थिंक लक्झरी' ही संकल्पना सुरु करत चक्क ऑडी या लक्झरी कारमध्ये चहा विक्रीचा निर्णय घेतला.
पाहा व्हिडीओ : तुम्ही 'ऑडी चहा' प्यायला का?
View this post on Instagram
सोशल मीडियावर तुफान चर्चा
सोशल मीडिया नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी ऑडी चहावाल्याच्या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत एकाने युजरने कमेंट करत लिहिलं आहे की, 'त्यांनी ऑडी विकत घेतली असेल आणि आता त्याचे हफ्ते भरण्यासाठी ते चहा विकत आहेत.' दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, 'कारचा मालक ऑडीमधून चहा विकून मर्सिडीज-बेंझ जी वॅगन खरेदी करण्याचा विचार करत आहे.' आणखी एका नेटकऱ्यानं प्रश्न उपस्थित केला आहे की 'त्यांनी चहा विकून ऑडी कार विकत घेतली आहे की ऑडी कार घेतल्यामुळे ते चहा विकत आहेत? तर आणखी एकाने लिहिलं आहे, 'वडीलांनी गाडीचे हफ्ते भरण्यास नकार दिला असेल, म्हणून यांना हे करावं लागतंय.'
मुंबईसह संपूर्ण देशात या ऑडी चहा च्या भन्नाट संकल्पनेची चर्चा आहे. मग तुम्ही ही या ऑडी चहा ची प्रत्यक्ष चव चाखण्यास जाताय ना?