एक्स्प्लोर

Indu Mill मधील बाबासाहेबांंच्या स्मारकाचं काम कधी पूर्ण होणार? सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले....

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली आणि हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल याची माहिती दिली.

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर मंत्र्यांनी आज मुंबईतील दादर परिसरामधील इंदू मिल इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली. 2023 अखेरपर्यंत किंवा 2024 सुरुवातीपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण करण्याचे प्रयत्न करु, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

स्मारकाची पाहणी केल्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले की, 2016 साली जेव्हा हा प्रकल्प हाती घेण्याचं ठरवलं तेव्हा याची किंमत सहाशे कोटी रुपये होती. मागील दोन वर्षात महाविकास आघाडीच्या सरकारने पुढे येऊन हे काम केलेलं आहे. आतापर्यंत 245 कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत. जवळपास अडीचशे कोटी रुपयांचा निधी या वर्षी आपण या प्रकल्पासाठी ठेवला आहे. या प्रकल्पासाठी यंदा 300 कोटी रुपये खर्च झाला त्या निधीची तरतूद सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आली आहे

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकची वाट संपूर्ण देश पाहत आहे. 2023 अखेरीस किंवा 2024 च्या सुरुवातीला स्मारकाचं काम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पण होईल अशा पद्धतीने आम्ही जलद गतीने काम सुरु ठेवलं आहे. ज्या पिलरवर स्मारक होणार आहे त्याचं 75 फुटापर्यंत काम पूर्ण झालं आहे. आणखी पंचवीस फुटाचं काम बाकी आहे. स्मारकापर्यंत जाण्यासाठी किती प्रदक्षिणा घालायची आहे त्याच्या स्ट्रक्चरचं काम बाकी आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

एक हजार लोकांची क्षमता असलेल्या वातानुकूलित ऑडिटोरियमचं काम सुद्धा सुरु आहे. स्मारकाच्या खाली पार्किंगचं काम देखील सुरु आहे. किती टक्के काम पूर्ण झालं हे आताच सांगता येणार नाही. पैशांची कुठलीही अडचण या कामासाठी होणार नाहीत, असंही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं.

प्रकल्पात अंतर्भूत असलेल्या बांधकामाची वैशिष्ट्ये

- प्रवेशद्वार इमारतीमध्ये माहिती सेंटर, तिकीट घर, लॉकअप रुम, प्रसाधनगृह, सुरक्षा गृह, स्मरणिका कक्ष, उपग्रह व नियंत्रण कक्ष त्यासोबतच इतर बाबींचा समावेश

- स्मारकाची उंची 450 फूट (पदपीठ उंची 100 फूट, वरील पुतळ्याची उंची 350 फूट)

- प्रेक्षागृह आसनक्षमता 1000

- संशोधन केंद्र, व्याख्यान वर्ग व ग्रंथालय

- ध्यान केंद्र

- तळघर वाहनतळ (पार्किंग क्षमता 460 वाहने)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Embed widget