एक्स्प्लोर
मुंबई विमानतळावर 'आयसिस'शी संबंधित संशयिताला अटक
आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरुन शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेश एटीएसनं ही कारवाई केली आहे.

मुंबई : आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरुन शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेश एटीएसनं ही कारवाई केली आहे. एटीएसच्या या कारवाईमुळे मुंबईत मोठ्या घातपाताच्या तयारीला ब्रेक मिळाल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. अबु जाहिद सलाउद्दीन शेख असं या संशय़ित आरोपीचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातल्या आझमगड इथला राहणार आहे. सध्या उत्तर प्रदेश पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आता त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. चौकशीअंती या कारवाईचा तपशील समोर येईल.
Before You Go
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय






















