एक्स्प्लोर
न्यायमूर्ती स्थानपन्न झाले आणि थेट घोषणा केली, कोर्टात नेमकं काय घडलं?
ही पहिली दोन वाक्य ऐकताच सर्व भुजबळ समर्थकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुललं. काहींनी ताबडतोब कोर्टाबाहेर धाव घेत आपल्या उत्साहाला वाट मोकळी करुन दिली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर आज (4 मे) जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर येणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वाढतं वय आणि ढासळती प्रकृती लक्षात घेत पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.
या चार अटींवर छगन भुजबळांना जामीन मिळाला
पण भुजबळांना जामीन देताना कोर्टात नेमकं काय झालं?
मुंबई उच्च न्यायालयात दुपारी तीन वाजता ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या जामीन अर्जावरील निकाल वाचनाची प्रक्रिया सुरु झाली. कोर्टात भुजबळांच्या कुटुंबातील काही मोजक्याच व्यक्ती उपस्थित होत्या. मात्र भुजबळ समर्थकांचा मोठा गराडा कोर्टरुममध्ये भरलेला होता.
न्यायमूर्ती पी.एन. देशमुख आपल्या आसनावर स्थानपन्न झाले. त्यानंतर त्यांनी थेट घोषणा केली की, "भुजबळांचा जामीन अर्ज स्वीकारलेला आहे, आणि हे कोर्ट याचिकाकर्त्यांना ताबडतोब जामीनावर सोडण्याचे निर्देश देत आहे."
अखेर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर
ही पहिली दोन वाक्य ऐकताच सर्व भुजबळ समर्थकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुललं. काहींनी ताबडतोब कोर्टाबाहेर धाव घेत आपल्या उत्साहाला वाट मोकळी करुन दिली. काहींनी बाहेर पडताच एकमेकांना अलिंगनं दिली. भुजबळ कुटुंबियांपैकी दोन महिलांनी आपल्यासोबत आणलेला प्रसाद समर्थकांत वाटला आणि तात्काळ बाहेर पडून, "हे कोर्ट आहे, इथे नको बाहेर चला." या शब्दांत सर्वांना सूचना केली. मात्र त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
दोन वर्षांनी भुजबळांना मिळालेला जामीन ही भुजबळ कुटुंबीयांसाठी सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी आहे, असं त्यांचे वकील सुजय कांटावाला यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
14 मार्च 2016 ते 4 मे 2018, भुजबळांची अटक ते जामीन, नेमकं काय घडलं?
शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालय छगन भुजबळांच्या जामीन अर्जावर काय निकाल देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. सकाळी नेहमीप्रमाणे कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाली. न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांनी सकाळच्या सत्रात काही मोजकीचं प्रकरण सुनावणीसाठी घेतली. दुपारी 12.30 च्या सुमारास न्यायमूर्ती देशमुख आपल्या दालनात निघून गेले.
सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार तिथे ते भुजबळांवरील निकालाचं काम लिखाण देण्यात व्यस्त होते. गेले दोन दिवस न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्यापुढे भुजबळांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद सुरु होता. गुरुवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता निकालाची घोषणा होईल असं न्यायमूर्ती देशमुखांनी जाहीर केलं होतं.
‘हे’ कलम रद्द झाल्याने छगन भुजबळ सुटले!
संबंधित बातम्या
छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?
छगन भुजबळांची चौकशी आणि अटकेचा संपूर्ण घटनाक्रम
छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?
छगन भुजबळांची चौकशी आणि अटकेचा संपूर्ण घटनाक्रम
कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?
‘माझ्यावरील आरोप खोटे, दमानियांवर कायदेशीर कारवाई करु’, भुजबळांचं जेलमधून पत्र
भुजबळ लढवय्ये, ते जेलबाहेर आले पाहिजेत: मंत्री दिलीप कांबळे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement