अटल सेतूला तडे; कंत्राटदारावर कारवाईचा बडगा, आकारला तब्बल 1 कोटींचा दंड
Atal Setu: 13 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु अवघ्या पाच महिन्यातच पुलाला तडे गेले होते अटल सेतू उलवे मधून सुरू होतो त्या ठिकाणी रस्ता काही प्रमाणामध्ये खचलेला आहे.
मुंबई : अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा सागरी जोडरस्त्यावर तडे पडल्या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली आहे. या जोडरस्त्याला तडे पडल्याची घटना जूनमध्ये समोर आली होकी. यानंतर एमएमआररडीए तात्काळ जोडरस्त्याची दुरूस्ती केली.. मात्र या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता कंत्राटदारावर कारवाई करून एक कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link) प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू वरून (Nhava Sheva Atal Setu ) उलवे येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जोडरस्त्यावर तडे पडल्याची बाब निदर्शनास आली होती. यानंतर आता कंत्राटदारावर कारवाई करण्यात आलीय. 13 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु अवघ्या पाच महिन्यातच पुलाला तडे गेले आहेत. अटल सेतू उलवे मधून सुरू होतो त्या ठिकाणी रस्ता काही प्रमाणामध्ये खचलेला आहे.
दीड-दोन तासांचा वेळ आता केवळ पंधरा मिनिटांवर
राज्य सरकारनं एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळं मुंबई ते पनवेल हे प्रवासाचं अंतर कमी झालं आहे. मुंबईतून नवी मुंबईमार्गे पनवेलपर्यंत प्रवास करण्यासाठी लागणारा दीड-दोन तासांचा वेळ आता केवळ पंधरा मिनिटांवर आला आहे.
संपूर्ण देशातील सर्वाधिक लांबीचा हा सागरी सेतू
शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा एक गेमचेंजर प्रकल्प आहे. दक्षिण मुंबईला थेट रायगड जिल्ह्याशी जोडणारा कनेक्टर आहे. देशातल्या सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूचं लोकार्पण 12 जानेवारीला झाले. या पुलावरून प्रवास करण्यासाठी टोल भरावा लागतो. शिवडी न्हावाशेवा पुलासाठी 250 रूपये टोल आकारण्यात येतो. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पाचा खर्च 21 हजार 200 कोटींवर गेलाय. सुमारे 30 वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.लांबीच्या निकषाने जगातील दहाव्या क्रमांकाचा हा सागरी सेतू आहे. संपूर्ण देशातील सर्वाधिक लांबीचा हा सागरी सेतू आहे.
हे ही वाचा :
अटल सेतूनंतर मुंबईकरांना कोस्टल रोडची प्रतीक्षा, लवकरच प्रवाश्यांसाठी खुली होणार एक मार्गिका, काम युद्धपातळीवर सुरु