एक्स्प्लोर

SSC Result : मुलांकडून प्रोत्साहन घेतं 53 व्या वर्षी आईनं मिळवलं यश, 79 टक्के गुण घेत दहावी उत्तीर्ण

वरळीत राहणाऱ्या कल्पना कोल्हेटकर (Kalpana Kolhetkar) या वयाच्या 53 व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

Maharashtra SSC Result 2022 : शिकण्यासाठी तुमचं वय नाही तर लागते ती जिद्द आणि चिकाटी. याच जिद्दीनं वयाच्या 53 व्या वर्षी वरळीत राहणाऱ्या कल्पना कोल्हेटकर (Kalpana Kolhetkar) यांनी आपलं दहावी पास होण्याचं स्वप्न पूर्ण  केलं आहे. त्या फक्त दहावी उत्तीर्ण झाल्या नाहीत, तर त्या विशेष प्राविण्य मिळवलं आहे. कोल्हेटकर यांनी 79.60 टक्के गुण मिळवत हे घवघवीत यश संपादन केलं आहे. कल्पना कोल्हेटकर यांना आपल्या मुलांनी व कुटुंबातील सदस्यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहित केल्यानं त्यांना हे यश मिळवता आलं, असल्याची त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

SSC Result : मुलांकडून प्रोत्साहन घेतं 53 व्या वर्षी आईनं मिळवलं यश, 79 टक्के गुण घेत दहावी उत्तीर्ण

तबब्ल तीस वर्षानंतर दहावीची परीक्षा दिली

कल्पना कोल्हेटकर यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. मात्र, मिल कामगारांच्या संपावेळी त्यांना मुंबई सोडावी लागली आणि त्या अलिबागला आपल्या कुटुंबियांसोबत राहायला गेल्या. त्यात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली आणि त्यांचे शिक्षण अर्धवट त्यांना सोडावं लागलं. मात्र, शिक्षणाची जिद्द कायम त्यांच्या मनात होती. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवलं. त्यांचा एक मुलगा परदेशात आयटी इंजिनिअर असून दुसरा मुलगा आंतरराष्ट्रीय रेसलर आहे. या दोन्ही मुलांनी आपल्या आईला तू पुन्हा एकदा शिकावं, असं म्हणत शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं आणि  तबब्ल तीस वर्षानंतर कल्पना यांनी दहावीची परीक्षा दिली. 

SSC Result : मुलांकडून प्रोत्साहन घेतं 53 व्या वर्षी आईनं मिळवलं यश, 79 टक्के गुण घेत दहावी उत्तीर्ण

दहावीची परीक्षा मार्चमध्ये असताना फेब्रुवारीमध्ये मोठ्या मुलाचं लग्न ठरलं. त्यामुळं एकीकडं मुलाच्या लग्नाची तयारी तर दुसरीकडे दहावी बोर्डाच्या परीक्षेची तयारी, अशी तारेवरची दुहेरी कसरत आईला करावी लागली. मात्र, यामध्ये सुद्धा त्यांनी जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत त्या चांगले गुण मिळवत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्या. वरळीच्या आदर्शनगर रात्र शाळेत त्यांनी दहावीच शिक्षण सुरु केलं होतं. आता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढेसुद्धा त्यांना या शिक्षणाच्या प्रवाहात राहायचं आहे. पुढचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. शिवाय, इतरांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करुन या प्रवाहात आणण्याचं काम त्यांना पुढील जीवनात करायचा आहे.

महत्वाच्या बातम्या:

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget