Raj Thackeray, Asha Bhosle : 'ग्रेट-भेट!' राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले शिवतीर्थावर

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी मंगळवारी (19 जुलै) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

Continues below advertisement

Raj Thackeray, Asha Bhosle : काही दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर लीलावती रुग्णालयात हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. सध्या राज ठाकरे यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी राज ठाकरेंची भेट घेतली. आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी मंगळवारी (19 जुलै) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आशा भोसले या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. 

Continues below advertisement

राज ठाकरेंनी रेखाटलं चित्र
आशा भोसले या जेव्हा राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर गेल्या होत्या तेव्हा राज ठाकरेंनी आशा भोसले यांचे एक चित्र रेखाटले.  तसेच राज ठाकरे यांनी आशा भोसले यांचा आशीर्वाद देखील घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आशा भोसले आणि राज ठाकरे यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे वाढले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करायला सांगितली. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांना डॉक्टरांनी दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये कोरोनाचे काही डेड सेल्स आढळून आले होते.  त्यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, अशी  मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ही माहिती देण्यात आली होती. 

शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी राज टाकरेंची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतील होती.

हेही वाचा:

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola