मुंबई : दहावीच्या परीक्षेमध्ये (SSC Exam Result) महापालिकेच्या सर्व शाळांतून अक्षरा वर्मा या मुलीने सर्व माध्यमातून पहिला क्रमांक पटकावला. तिच्या या यशाचं कौतुक करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तिचे अभिनंदन केलं. 90  टक्क्यांहून अधिक गुण मिळवणे सोपे वाटत असले तरी प्रत्येक टक्का महत्त्वाचा असतो, असे ठाकरे म्हणाले. अक्षरा वर्मा ही वरळी सी फेस मुनिसिपल सेकंडरी स्कूलची विद्यार्थीनी असून तिने 96.80 गुण मिळवत बीएमसी शाळांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. 

Continues below advertisement


यशामागे सामूहिक आणि वैयक्तिक मेहनत असं देखील आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं. या यशामागे आई-वडील, शिक्षक आणि स्वतः विद्यार्थिनीची मेहनत आहे. यामुळेच मी आज तिचे अभिनंदन करायला आलो आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.


पहिली आलेल्या मुलीचे कौतुक


अक्षरा वर्माला मदत करण्याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, आपण पाहतो की ती तिच्या मेहनतीमुळे पुढे आली आहे. मदतीबाबत माध्यमांसमोर चर्चा करायची नाही. 


छगन भुजबळ यांच्याविषयी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला. जी मुलगी पहिली आली मला तिचे कौतुक जास्त आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राजकारणावर उत्तर देणं टाळलं.


Maharashtra SSC Results 2025 : यंदा दहावीचा निकाल 94.10 टक्के 


यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे.


दहावीच्या निकालाची विभागनिहाय टक्केवारी 



अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन 


दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे. 


ही बातमी वाचा: