एक्स्प्लोर

Aryan Khan : आर्यन खान जामीन याचिकावरील सुनावणी उद्यावर ढकलली, आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार

Cruise Drug Case : आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन याचिकेवर सुरु असलेली सुनावणी आता पुन्हा एकदा उद्यावर ढकलली आहे. त्यामुळे आजची रात्रही त्याला आर्थर रोड तुरुंगात काढावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं. 

मुंबई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीनावर आजही निर्णय झाला नसून आजची रात्रही त्याला तुरुंगातच काढावी लागणार आहे. आता त्याच्या जामीन याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. आर्यन खानची रवाणगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे. आर्यन खान गेल्या 21 दिवसांपासून तुरुंगात आहे. 

आर्यन खानला आता जामीन मिळणार की त्याची दिवाळी आता तुरुंगातच जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही असा आरोप आर्यन खानच्या वकिलांनी केला. आर्यन हा शाहरूख खानचा मुलगा असल्याने हे प्रकरण तपासयंत्रणेने ताणून धरले आहे. तो सर्वसामन्याचा मुलगा असता तर, एवढे झालेच नसते. आर्यन खानला याप्रकरणात पूर्णपणे गोवण्यात आल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात केला होता.

Mumbai Drug Case: एनसीबीकडून अधिकारांचा दुरुपयोग, आर्यन खानच्या अटकेवर जेष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी यांची प्रतिक्रिया

दरम्यान, आर्यनच्या जामिनाला एनसीबीचा विरोध केला होता. गुणवत्तेच्या आधारावर आर्यनच्या जामिनाची याचिका फेटाळून लावण्याची एनसीबीच्या वकिलांनी मागणी केली होती. तपासाच्या या टप्प्यावर जामीन दिल्यास खटल्यावर थेट परिणाम होईल असा दावा एनसीबीच्या वतीनं करण्यात आला होता. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल फुटला आहे, त्यामुळे प्रभाकर साईल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची न्यायालयानं दखल घेऊ नये अशी विनंती एनसीबीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली होती. 

गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामिनावर सुनावणी झाली आहे. 

Cruise Drug Case : मुंबई पोलिसांनी पंच प्रभाकर साईल यांचा जबाब नोंदवला; पहाटे तीनपर्यंत सुरु होती प्रक्रिया, NCBकडून आज चौकशीची शक्यता

आर्यन खान क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

  • 2 ऑक्टोबरच्या शनिवारी मुंबई क्रुझ टर्मिनलवर धाड
  • 3 ऑक्टोबरला रविवारी आर्यनला अटक आणि सुट्टिकालीन कोर्टाकडनं पहिली रिमांड 4 ऑक्टोबरपर्यंत
  • 4 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी एनसीबीला नियमित कोर्टाकडनं मिळाली 7 ऑक्टोबरपर्यंत रिमांड
  • 7 ऑक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावली
  • आर्यनखानची रवानगी आर्थर रोड कारागृहात, कोरोनाकाळामुळे नियमाप्रमाणे आठवड्याभरासाठी विलगीकरण कक्षात ठेवलं
  • न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनच्या जामिनाची याचिका सादर करण्यात आली
  • 8 ऑक्टोबरला जामीनावर सुनावणी झाली, मात्र एनसीबीनं त्यावर आक्षेप घेतला
  • मुख्य महानगदंडाधिकारी कोर्टाच्या कार्यक्षेबाहेरील हे प्रकरण असल्याचा एनसीबीचा दावा मान्य, जामीन फेटाळला
  • 9-10 ऑक्टोबर शनिवार रविवार असल्यानं कोर्ट बंद
  • 11 ऑक्टोबरला सोमवारी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात सादर
  • एनसीबीनं अपेक्षेप्रमाणे उत्तर देण्यासाठी मागितला आठवड्याचा अवधी, मात्र बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे कोर्टाकडून निर्देश
    12 ऑक्टोबर कोर्टात काहीही कारवाई नाही
  • 13 ऑक्टोबर जामीनावर सुनावणी, एनसीबीचा जोरदार विरोध
  • समाजातील प्रतिष्ठा पाहता तो बाहेर आल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपलं वजन वापरून त्याच्यावतीनं पुराव्यांशी छेडछाड आणि अन्य साक्षीदारांवर दबावही आणला जाऊ शकतो. असा दावा करत एनसीबीनं बुधवारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.
  • आरोपीकडे अमली पदार्थ सापडोत अथवा न सापडोत, एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. तुमच्याकडे ड्रग्ज नाही जरी सापडले तरी जेव्हा एनडीपीएस कायद्यातील कलम 29 लावलं जातं तेव्हा आरोपी मुख्य सुत्रधाराइतकाच दोषी असतो असं एनसीबीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं.
  • 14 ऑक्टोबरला जामीनावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश वी.वी. पाटील यांनी निकाल राखून ठेवला
  • 15 ते 19 ऑक्टोबर कोर्ट सणासुदीच्यानित्तानं बंद असल्यामुळे निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न करू : कोर्ट
  • 20 ऑक्टोबर कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला

नवाब मलिकांचा नवा दावा, समीर वानखेडेंचा 'निकाहनामा' केला जाहीर, वानखेडेंच्या पहिल्या पत्नीसोबतचा फोटोही ट्वीट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget