एक्स्प्लोर

Big Breaking : शाहरुखकडे 25 कोटींच्या मागणीचा दावा; समीर वानखेडे यांच्याकडून आरोपांचं खंडन

सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. शाहरुखकडे 25 कोटींची मागणी केल्याचा दावा एका पंचाने केला आहे. समीर वानखेडेंकडून आरोपांचं खंडन.

Drugs Case Update: आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी दिली आहे. दरम्यान, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी या आरोप फेटाळून लावले आहेत. या विषयावर संध्याकाळी सविस्तर बोलेन, असे वानखेडे म्हणाले आहेत. मात्र, या आरोपांमुळे देशभरात खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्येच जुंपली आहे.

काय आहे प्रकरण?
एबीपी माझाशी बोलताना एनसीबी रेडचे पंच क्रमांक 1 असलेले प्रभाकर साईल यांनी सांगितलं की, त्यांची या प्रकरणात पंच म्हणून सही घेतली होती. मात्र, तो कागद कोरा (ब्लँक) होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटला बोलवलं आणि त्यानंतर साईल यांनी गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं. साईल यांनी सांगितलं की, माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचिताकडे सोलापूरला 10-12 दिवस राहिलो.

कोण आहे प्रभाकर साईल 

  • प्रभाकर साईल हे क्रुझ कारवाई प्रकरणातील प्रथम क्रमांकाचे नाव असणारे पंच आहेत.
  • हा पंच किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड आहे. 
  • किरण गोसावींकडेच याची राहण्याची व खाण्याची व्यवस्था आहे.

ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबी सांगत असलेला मुख्य साक्षीदार किरण गोसावी एक सराईत गुन्हेगार!
क्रुझ कारवाईच्या दिवशी काय झालं
प्रभाकर साईल यांनी सांगितलं की, क्रुझ कारवाई झाली त्यादिशी मी किरण गोसावींसोबतच होतो. किरण गोसावी एनसीबी ऑफिसला गेले. मी खालीच थांबलो होतो. गोसावीबरोबर सव्वा बाराला खाली आलो. आम्ही तिथून जवळच जाऊन फ्रँकी, थम्सअप घेतलं. तिथून ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत गेल्यानंतर तिथे समीर वानखेडे आणि त्यांचे सहकारी बसले होते तिथे त्यांना फ्रँकी आणि पाणी-थम्सअप वगैरे दिले. नंतर क्रुझच्या बाहेर गेलो. तिथुन मला एका ठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको असे सांगितलं. मला काही फोटो दाखवण्यात आले होते व ते फोटो असलेले लोक आले की त्यांना ओळखायला सांगितलं होतं. फोटोतल्या व्यक्ती आल्या की मला गोसावींना रिपोर्ट करायचं होतं, असं साईल यांनी सांगितलं.

साईलनं सांगितलं की, क्रुझवर घेऊन जायला एक बस होती. बसमधून कोण जातं त्याला ओळखायला सांगितलं होतं. 2700 नंबरच्या बसमध्ये फोटोमधली एक व्यक्ती बसली त्यालाच मी ओळखलं. बाकीच्यांना ओळखलं नाही कारण सर्वांनीच मास्क घातले होते. 4.29 वाजता मला फोटो दिले त्यातील 13 व्यक्ती आल्या आहेत असा मॅसेज दिला. आर्यन खान माझ्यासमोरच आले होते. त्यांना घ्यायला बस नाही तर क्रुझवरची व्हिआयपी गाडी आली होती. कारवाई करताना मी क्रुझवर नव्हतो. क्रुझच्या गेटवर होतो. क्रुझवर मी साडेअकरा दरम्यान पोहोचलो होतो.

क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावीबद्दल आणखी एक धक्कादायक प्रकरण उघड! पालघरमधील दोघांची फसवणूक

मला ब्लँक पेपरवर सह्या करायला लावल्या : साईल
मी आणि किरण गोसावी आणि मनिष भानुशाली हे बाहेरचे लोक होतो. क्रुझवर कारवाई दरम्यान किरण गोसावी, वानखेडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. 11.30 दरम्यान मी बोर्डींगजवळ गेलो. तेव्हा मी आर्यन खानला केबिनमध्ये बसलेलं बघितलं. एनसीबी कार्यालयात जेव्हा पावणेबाराला सगळ्यांना आणलं. तेव्हा पंचाचा साक्षीदार म्हणून मला सही करायला एनसीबी कार्यालयात वर बोलावलं. तिथे साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्यानं मला ब्लँक पेपरवर सह्या करायला लावल्या. मी याबाबत किरण गोसावींकडे ब्लँक पेपरवर कश्या सह्या करु असं विचारलं तेव्हा समीर वानखेडे तिथे आले आणि म्हणाले काय नाही होत तू कर सह्या. मी सह्या केल्या. 9 ते 10 ब्लँक पेपरवर मला सह्या करायला लावल्या. माझं आधारकार्ड मी त्यांना व्हॉटसअप केलं. पंच म्हणून जेव्हा माझी सही घेतली तेव्हा पेपर पूर्ण ब्लँक होते, असं साईल यांनी सांगितलं.

साईल यांनी पुढं सांगितलं की, NCBच्या अधिकाऱ्यांकडे ऑफिसमध्ये सॅनिटरी पॅड, प्लास्टिकच्या बरण्या असं सामान होते. एनसीबी कार्यालयात तेव्हा एका चेअरवर आर्यन खान आणि शेजारी किरण गोसावी बसले होते, तेव्हा मी त्यांचा गपचुप व्हिडीओ शुट केला. व्हिडीओमध्ये किरण गोसावी एका फोनवर आर्यनचं कुणाशी ती बोलणं करुन देत होता. 

किरण गोसावींचा काय रोल
साईल यांनी सांगितलं की, किरण गोसावींकडे मी 22 जूलैपासून बॉडीगार्ड म्हणून काम करतो. ठाण्याला काम करायचो. गोसावी कारवाईच्या अगोदर अहमदाबावरुन निघाले होते. किरण गोसावी पावणेतीनला एनसीबी ऑफीसच्या खाली आले. तेव्हा सॅम नावाचा व्यक्ती गोसावींना भेटायला आला होता. रात्रीतुन दोन वेळा त्यांची मिटींग झाली. साडेचारला एनसीबीहून लोअर परळला निघालो. तेव्हा त्यांनी सॅमला फोन केला. फोनवर म्हणाले, 'उनको बोल 25 करोड में डील करने के लिये. 18 करोड में फायनल कर. 8 करोड वानखेडे को देना हैं' सॅम हा शाहरुख खान आणि गोसावी मधला को ऑर्डीनेटर होता, असा दावाही साईल यांनी केला आहे.

साईल यांनी सांगितलं की, मला लोअर परळला दोन गाड्या दिसल्या होत्या. त्यापैकी एका गाडीत पुजा ददलानी होती. किरण गोसावी, सॅम आणि पुजामध्ये 15-20 मिनीट बोलणं झालं. 3 तारखेच्या साडेपाचला सकाळी पुव्हा गोसावींना सॅमचा फोन आला. पुजा तेव्हा फोन उचलत नाही असं सॅम सांगत होता. किरण गोसावींनी व्हॉटसअप कॉल साडेचार दरम्यान केला होता आणि कारवाईनंतरच्या डिलबाबत सांगितलं. पाचपर्यंत मला पुन्हा किरण गोसावींचा फोन आला. अर्जंट  ताडदेव रोडला इंडीयाना हॉटेल बाहेरुन पैसे कलेक्ट करायचे आहेत. तिथे 5201 नंबरची गाडी होती. तिथे दोन कागदी पिशव्यांमधून 50 लाख रुपये घेऊन गाडीत बसून मी सांगितल्याप्रमाणे वाशीला आलो. वाशीला येऊन मी पैसे सरांना दिले. सर आणि त्यांची मिसेस बॅग घेऊन निघण्याच्या तयारीत होते. संध्याकाळी 5 ला वाशी इनॉर्बीट मॉलला बोलावून किरण गोसावींनी मला पुन्हा  पैशाची पिशवी दिली. तिथुन ओलाने मी चर्चगेटला गेलो. ती पिशवी सॅमला दिली. त्या पिशवीत 38 लाख रुपयेच होते.  सॅमने याबाबत किरण गोसावीला फोनवरुन विचारलं.गोसावीने दोन दिवसांत व्यवस्था करतो सांगितलं,असं प्रभाकर यांनी सांगितलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget