(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aryan Khan Drugs case : आरोपपत्र दाखल करण्यासाठी NCB SIT ने मागितला 90 दिवसांचा अवधी
कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) 18 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
Aryan Khan Drugs case : NCB च्या SIT ने कार्डिलिया क्रुझ ड्रग्जप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. एनसीबीच्या एसआयटीने 90 दिवसांचा अवधी मागितला आहे. 2 एप्रिलपर्यंत एनसीबीला या प्रकरणी आरोपपत्र दाखल करायचे होते. या प्रकरणी आतापर्यंत बॉलिवूडचा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 18 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या एसआयटीने आज मुंबईच्या सत्र न्यायालयात हा अर्ज केला आहे.
NCB SIT ने मागितला 90 दिवसांचा अवधी
NCB च्या SIT ने कार्डिलिया क्रुझ ड्रग्जप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. एनसीबीच्या एसआयटीने 90 दिवसांचा अवधी मागितला आहे. आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी एनसीबीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखीन 90 दिवसांची मुदतवाढ हवी आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या एसआयटीनं सोमवारी यासाठी मुंबई सत्र न्यायालयात रितसर अर्ज सादर केला आहे. याप्रकरणी अद्याप तपास सुरू असल्यामुळे ही मुदतवाढ देण्याची तपासयंत्रणेकडून विनंती करण्यात आली आहे. एनडीपीएस कायद्यानं गुन्हा दाखल केल्यापासून 180 दिवसांत तपासयंत्रणेला आरोपपत्र दाखल करणं अनिवार्य असंत, त्यांची ही मुदत येत्या 2 एप्रिलला ही मुदत संपणार आहे. त्यामुळे लवकरच सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. याप्रकरणी आर्यन खानसह एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली होती, ज्यापैकी 18 सध्या जामीनावर असून तस्करीच्या आरोपात अटक झालेले दोन परदेशी नागरीक अद्याप जेेलमध्येच आहेत.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोर्डिलिया आलिशान क्रूझवर 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. आर्यनसह अरबाज आणि मुनमुन धमेचाच्यावतीनं सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. हायकोर्टानं 28 ऑक्टोबर रोजी कठोर अटीशर्तींसह या तिघांना जामीन मंजूर केला आहे.
याप्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक आणि या तपासाचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडेंविरोधात जोरदार आरोपांची मोहीम सुरू केली होती. वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचेही गंभीर आरोपही झाले. या प्रकरणावरून एकूणच एनसीबीच्या कार्यपद्धतीवरही अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. त्यामुळे नाईलाजानं या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्लीतील विशेष तपास पथकाकडे हस्तांतरित करण्यात आला. याच प्रकरणाचा परिणाम म्हणून समीर वानखेडे यांना एनसीबीकडनं मुदतवाढही नाकारण्यात आल्याची चर्चा आहे. तर नवाब मलिक यांनाही ईडीनं एका प्रकरणात अटक केली असून ते सध्या आर्थर रोड कारगृहात आहेत.
आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं
कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टी प्रकरणी एनसीबीनं टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थ सापडल्यानं आर्यन खानसह इतर अनेक जणांना एनसीबीनं अटक केली होती. न्यायालयीन लढाईनंतर आर्यनला जामीन मिळाला आहेच, मात्र एनसीबीच्या एसआयटीचा अहवाल येणं हा अधिक मोठा दिलासा असल्याचं बोलंलं जात आहे. अशातच एसआयटीच्या अहवालानंतर एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीही वाढल्या होत्या. कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी एनसीबीनं (NCB) स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासात निष्कर्ष समोर आले होते. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान याच्याकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते, असा निष्कर्ष या समितीनं तपासाअंती दिला होता. तसंच आर्यन खानचे कोणत्याही ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचंही एनसीबीच्या एसआयटीचं (NCB SIT) म्हणणं होतं. दरम्यान, आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीनं 3 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती. तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं.
संबंधित बातम्या
आर्यनला दिलासा, वानखेडेंना झटका? कॉर्डेलिया क्रूझवरील कारवाईत आर्यनकडे अंमली पदार्थ नव्हते, NCB SIT च्या अहवालात माहिती
Aryan Khan Debut : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण; डेब्यू करण्यासाठी सज्ज