Art Festival : 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल 2022' 14 ते16 जानेवारी दरम्यान
Art Festival : येत्या 14 ते 16 जानेवारी दरम्यान 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल 2022' चे आयोजन करण्यात आले आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Park Art Festival : 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल 2022' येत्या 14 ते16 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यात नामांकित कला संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या सहयोगाने विविध सामाजिक संकल्पनांवर आधारित 'कलाशिल्प सादरीकरण' केले जाणार आहे.
पार्क परिसराच्या भोवताली कलाकारांच्या कलात्मकतेतून कलाकृतींची सजावट करण्यात येणार आहे. खाद्य रसिकांसाठी खाद्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर सागर किनारी स्वर सागर व्यासपीठाच्या माध्यमातून संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित, नावाजलेल्या व्यक्तींच्या यशोगाथा तसेच महत्वाच्या विषयांवर त्यांचे विचार ऐकण्यासाठी संवाद कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे. कलेसोबत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या शौर्याच्या यशोगाथा आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी 'गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन' तसेच 'ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शना'चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध कलास्पर्धांचे आयोजन या कला महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला विनामूल्य व्यासपीठ सदर कलामहोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव असणार आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल २०२२ मुंबईकरांसाठी अनोखी कलापर्वणी ठरणार आहे.
संबंधित बातम्या
Mumbai: भारतातून परदेशात अंमली पदार्थांची तस्करी, मुंबई एनसीबीकडून दोन दिवसांत आठ कारवाई
Good News : Covavax : लवकरच लहान मुलांसाठी येणार कोरोनाची कोवाव्हॅक्स लस
Mumbai School Reopen : मुंबईत उद्यापासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करा, पालिकेचे मुख्याध्यापकांना निर्देश, पालक संभ्रमात
ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्यावर, सकाळी होणार पुढची सुनावणी
Omicron Variant : देशाची चिंता वाढली! दिल्लीत ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण, ओमायक्रॉन बाधितांची संख्या 45 वर, महाराष्ट्रात सर्वाधिक 20 रुग्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha