एक्स्प्लोर

डोंबिवलीत आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचा गोरखधंदा, बालकामगारांकडून अस्वच्छ वातावरणात गोळ्यांची पॅकिंग

एका छोट्याशी गाळ्यात तीन मळक्या कपड्यातले बालकामगार कुठल्याही प्रकारची काळजी न घेता या गोळ्या उघड्या हाताने पॅक करत होते. इतकंच नव्हे, तर तज्ज्ञांच्या अनुपस्थितीत या गोळ्यांवर आर्सेनिक औषधही टाकलं जात होतं.

कल्याण : कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं गरजेचं असून यासाठी आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचं सेवन करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयानं दिला आहे. यानंतर या गोळ्यांची वाढलेली मागणी लक्षात पाहता डोंबिवलीत गोळ्यांचा गोरखधंदा सुरू करण्यात आला होता. मात्र मनसेनं या प्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर पोलीस आणि एफडीएनं इथे कारवाईचा बडगा उगारला.

कोरोनाशी दोन हात करायचे असतील, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं असून यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्या घेण्याचा पर्याय आयुष मंत्रालयानं सुचवला होता. यानंतर या गोळ्यांना मोठी मागणी वाढली आहे. मात्र या वाहत्या गंगेत हात धुवून घेणाऱ्या डोंबिवलीच्या एका होमिओपॅथिक व्यापाऱ्याला मनसैनिकांच्या जागरूकतेमुळे लगाम बसला. डोंबिवली पश्चिमेच्या सुभाष रोडवर हेमंत होमिओ फार्मसी नावाचं दुकान असून तिथे या गोळ्यांची विक्री केली जात होती. मागच्या काही दिवसात शेकडो लोकांनी या गोळ्या इथून नेल्या होत्या. मात्र या गोळ्यांची पॅकिंग कशी केली जाते, हे पाहिल्यानंतर लोकांना चक्कर आल्याशिवाय राहणार नाही.

एका छोट्याशी गाळ्यात तीन मळक्या कपड्यातले बालकामगार कुठल्याही प्रकारची काळजी न घेता या गोळ्या उघड्या हाताने पॅक करत होते. इतकंच नव्हे, तर तज्ज्ञांच्या अनुपस्थितीत या गोळ्यांवर आर्सेनिक औषधही टाकलं जात होतं. याचा मनसैनिकांनी जाब विचारल्यानंतर दुकानदाराने फक्त सॉरी म्हणून वेळ निभावून नेली, मात्र या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी आज सकाळपासून गोळ्या परत करायला गर्दी केली.

या सगळ्यानंतर पोलिसांनी या फार्मसी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर एफडीएनंही आज दोन ते तीन तास या फार्मसी चालकाची कसून चौकशी करत कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्याच्या गोरखधंद्याला चाप बसला आहे. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीची मागणी वाढली, की तिचा गोरखधंदा सुरू होतो. मग ते हॅन्ड सॅनिटायझर असो, एन 95 मास्क असो किंवा मग आता या आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या, या संकटाच्या काळात लोकांना आधाराची गरज असताना त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना धडा शिकवला गेलाच पाहिजे.

संबंधित बातम्या 
Lockdown 4.0 Guidelines | नॉन रेड झोनमध्ये जिल्ह्यांतर्गत बसेस सुरू करण्याचा निर्णय : राजेश टोपे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget