एक्स्प्लोर
Advertisement
ताजमधून उडी मारणाऱ्या अर्जुनचे प्राण सेफ्टी लॉकमुळे वाचले नाहीत?
मुंबई : फेसबुक लाईव्हमध्ये आत्महत्येचं प्रात्यक्षिक दाखवत असल्याचं सांगत ताज हॉटेलमधून उडी मारणाऱ्या अर्जुन भारद्वाजच्या शेवटच्या क्षणांची माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. ऑनलाईन जुगारात पैसे हरल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अर्जुनचं फेसबुक लाईव्ह पाहून त्याच्या मित्रांनी तातडीनं ताज हॉटेलशी संपर्क साधला. हॉटेलच्या सुरक्षारक्षकांनी 19 व्या मजल्यावरील अर्जुनची रुम मास्टरकीच्या मदतीनं उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्जुनने सेफ्टी लॅच लावला असल्यानं त्यांना दार उघडता आलं नाही.
दुसरीकडे अर्जुनचे खिडकीची काच तोडण्याचे प्रयत्न सुरु होते. काच तुटत नाही हे पाहुन अर्जुनने रुममधलं स्टूल तोडलं आणि त्याने काच तोडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सुरक्षारक्षकही रुमचं लॅच तोडण्याचा प्रयत्न करत होते.
मुंबईतील ताज हॉटेलच्या 19 व्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाची आत्महत्या
काही वेळात लॅच तोडण्यात सुरक्षारक्षकांना यश आलं. मात्र तोपर्यंत अर्जुनही काच तोडण्यात यशस्वी झाला होता. काही कळायच्या आतच त्यानं 19 व्या मजल्यावरुन उडी मारली. 13 व्या मजल्यावरील पॅराफीटवर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ऑनलाईन जुगारामध्ये पैसे हरल्यानं अर्जुन नैराश्यात गेला होता. याच नैराश्यातून त्यानं हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. ताज हॉटेलमधील त्याच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली होती. या सुसाईड नोटमध्ये त्याने आपण ड्रग अॅडिक्ट असून आपल्याला जगण्याचा कंटाळा आल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. अर्जुन मुंबईतील प्रसिद्ध एनएम कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याचे वडिल बंगळुरुतील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement