एक्स्प्लोर

Exclusive: किरण खेर यांच्या मृत्यूच्या अफवा खूप अस्वस्थ करतात, खोट्या बातम्या पसरवू नका, अनुपम खेर यांचं आवाहन

अनुपम खेर यांनी एबीपी न्यूजशी बोलताना आपली पत्नी किरण खेर यांच्या मृत्यूच्या अफवांमुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले आहे.

मुंबई : नुकतेच कर्करोगाचे निदान झालेली अभिनेत्री आणि भाजप खासदार किरण खेर यांच्या मृत्यूच्या अफवांनी पुन्हा एकदा सर्वांना घाबरवले. किरण खेर यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोग झाल्याच्या बातमीनंतर, दुसऱ्यांदा अशाप्रकारे त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या आहेत. एबीपी न्यूजशी बोलताना अनुपम खेर यांनी आपल्या पत्नीच्या मृत्यू संदर्भात उडणाऱ्या अफवांमुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले आहे.

किरण खेरबद्दल एबीपी न्यूजशी बोलताना अनुपम खेर म्हणाले की, अशा अफवा मला अस्वस्थ करतात, यामुळे मानसिक त्रासही होत आहे. अचानक जेव्हा मित्र आणि नातेवाईकांचे रात्री दहानंतर मला फोन येतात आणि किरणच्या प्रकृतीविषयी मला विचारण्यात येते. तेव्हा यांना अचानक काय झालंय? हे असे प्रश्न का विचारतायेत हे मला कळत नाही. पण आता या अफवांबद्दल काय करता येईल?"
 
रक्ताच्या कर्करोगाशी लढणारी आपली पत्नी किरण खेर यांच्या आरोग्यविषयक माहिती देताना अनुपम खेर यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, "सध्या तिची तब्येत चांगली आहे. तिच्यावर सुरु असलेले उपचार फार कठीण आहेत, महिन्यात दोनदा केमोथेरपी घेण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात जावं लागतंय. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर खूप चांगले आहेत. परदेशातूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत."
 
किरण खेर यांच्या मृत्यूची अफवा 07 मे रोजी पुन्हा एकदा पसरल्यानंतर अनुपम खेर यांचे मित्र, जवळचे, नातेवाईक आणि हितचिंतक यांचे सतत फोन येत होते. अशा परिस्थितीत अनुपम खेर यांनी अशा सर्व अफवांना फेटाळून लावत ट्विटरवर किरण खेरशी संबंधित आरोग्यविषयक अपडेट दिले.
 
अनुपम खेर यांनी रात्री 11.25 वाजता ट्विट केलं करत लिहलं की, "किरणच्या तब्येतीबद्दल अफवा सुरू आहेत. या सर्व खोट्या अफवा आहेत. ती अगदी चांगली आहे. तिने आज दुपारी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मी लोकांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या नकारात्मकत बातम्या पसरवू नका." धन्यवाद. "

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget